आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयकर विभागाने बुधवारी मुंबई आणि पुण्यातील 4 बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घर आणि ऑफिसवर छापे टाकले. अभिनेत्री तापसी पन्नू, निर्माता अनुराग कश्यप, विकास बहल आणि मधु मंटेना हे चार सेलिब्रिटी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सलग दुस-या दिवशीदेखील ही कारवाई सुरु होती. पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या धाडसत्रानंतर सोशल मीडियावर अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या संपत्तीविषयी चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, अनुराग कश्यप यांच्याकडे तब्बल 806 कोटींची मालमत्ता आहे, तर तापसी पन्नूदेखील 44 कोटींची मालकीण असल्याचे सांगितले जात आहे.
एका चित्रपटासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेते तापसी
सीएनॉलाज या वेबसाइटनुसार, तापसी पन्नू वर्षाकाठी किमान 4 कोटी रुपये कमवते. अशा प्रकारे, तिची एका महिन्याची कमाई 30 लाखांहून अधिक असू शकते. 2019-2020 मध्ये तापसी चित्रपटांसाठी 1 ते 2 कोटी रुपये मानधन घ्यायची. मात्र, ताज्या बातम्यांनुसार, आता ती एका चित्रपटासाठी 8 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ती 10 ब्रॅण्ड्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरदेखील आहे. ब्रँड अॅन्डॉर्समेंट्सद्वारे ती वर्षाकाठी 2 कोटी रुपयांची कमाई करते.
तीन वर्षे तेलगू चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर तापसीने 2013 मध्ये 'चश्मे-बद्दूर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर, ती 'बेबी', 'बदला', 'सांड की आँख', 'मिशन मंगल', 'मनमर्जिया', 'थप्पड' या चित्रपटांमध्ये दिसली. 'हसीन दिलरुबा', 'लूप लपेटा', 'रश्मी रॉकेट' आणि 'शाबाश मिठू' हे तापसीचे आगामी चित्रपट आहेत.
अनुराग कश्यप यांची वार्षिक कमाई 60 कोटींपेक्षा जास्त
सीएनॉलेज या वेबसाइटनुसार, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्याकडे 806 कोटींची संपत्ती आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी अनुरागला सुमारे 11 कोटी रुपये मिळतात. ते एका वर्षात सुमारे 60 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात. त्यांचे एक महिन्याचे उत्पन्न 6 कोटींपेक्षा जास्त आहे.
अनुराग कश्यप यांच्याकडे 4 कोटींच्या लक्झरी कार आहेत. दर वर्षी ते किमान 9.8 कोटी रुपये आयकर भरतात. अनुराग यांनी 'ब्लॅक फ्रायडे', 'गुलाल', 'नो स्मोकिंग', 'देव डी', 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि 'बॉम्बे वेलवेट' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.