आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित साधचा वाढदिवस:'सुल्तान' फेम अमितने कधीकाळी चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, टीव्ही इंडस्ट्रीने बॅन केल्यानंतर बॉलिवूडमध्ये निर्माण केली स्वतःची ओळख

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमित साधने सांगितले होते की, 16 ते 18 वर्षांच्या वयात मी चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

'काय पो छे', 'सुल्तान' आणि 'गोल्ड' यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता अमित साध आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 5 जून 1983 रोजी जन्मलेला अमित 38 वर्षांचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अमितने एक धक्कादायक खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, किशोरवयात असताना त्याने चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अमितने सांगितल्यानुसार, या विचारांमागे ठोस असे कुठलेही कारण नव्हते.

अमित साधने सांगितल्यानुसार, अचानक एक दिवस आपण आपले आयुष्य संपवून टाकावे, असे त्यच्या मनात आले होते. तो सांगतो, “16 ते 18 वर्षाच्या वयात मी स्वत: चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार नव्हता, फक्त मला आत्महत्या करायची होती.''

तो पुढे सांगतो, ''काही योजना आखली नव्हती. अचानकच माझी जगण्याची इच्छा निघून जायची. जेव्हा चौथ्यांदा प्रयत्न केला, तेव्हा खरंच मनातून वाटले की आपण असे जगू शकत नाही. आपला शेवट असा असू नये. तेव्हापासून माझी मानसिकता बदलली. काहीही झाले तरी हार मानू नये, असे मनाशी पक्कं ठरवले आणि पुढचा प्रवास सुरू केला”, असे अमितने सांगितले होते. इतकेच नाही तर जवळपास वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर नैराश्य, चिडचिडेपणा, आत्महत्येचा विचार यापासून मुक्तता मिळाल्याचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला होता.

एका मोठ्या अभिनेत्याने मला वेडे ठरवले होते
आपल्या आयुष्यातील या कठीण काळाचा उल्लेख करताना अमित साध म्हणाला होता, "मला आठवतेय एका मोठ्या अभिनेत्याने माझ्या एक्स गर्लफ्रेंडला सांगितले होते की 'हा वेडा आहे, त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जा.' मग दोन वर्षांनंतर जेव्हा मी त्या अभिनेत्याला भेटलो तेव्हा मी त्याला सांगितले की, 'सर, मी वेडा नाही."

टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या बॅनला सामोरे जावे लागले होते
अमितने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. वयाच्या 20 व्या वर्षी तो 'क्यों होता है प्यार' या मालिकेत झळकला होता. या मालिकेच्या यशानंतर गटबाजीचा फटका अमितला
बसला होता आणि त्याला टीव्ही इंडस्टीत काम मिळणे बंद झाले होते.

अमितने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी चित्रपटांमध्ये काम मिळावे म्हणून टीव्ही इंडस्ट्री सोडली नव्हती. टेलिव्हिजन इंडस्ट्रीने माझ्यावर बंदी घातली होती. येथे काम करणा-या लोकांनी एकमेकांना फोन करुन सांगितले की, याला काम देऊ नका. मग मी स्वतःलाच म्हणालो की, ठिक आहे तुम्ही काम देत नाही, तर मग मी चित्रपटांमध्ये जातो.' नंतर मला टीव्ही इंडस्ट्रीतील एका मोठ्या निर्मात्याचा फोन आला. मी त्यालाही म्हणालो की, 'सर तुमही चुकीचे वागलात, तर मीदेखील याविरोधात लढा देईल.'

2010 मध्ये बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
2010 मध्ये अमितने राम गोपाल वर्मांच्या 'फूंक 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने 'काय पो छे', 'गुड्डू रंगीला', 'सुल्तान', 'सरकार 3' आणि 'गोल्ड' सारख्या चित्रपटांमध्ये
काम केले.

अमित साधचा शेवटचा चित्रपट 'शकुंतला देवी' हा होता. या चित्रपटात अमितसह विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट मागील वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय अमितने 'ब्रीदः इंटू द शेडो' आणि 'अवरोध : द सीज विदइन' या दोन वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...