आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कपूर यांच्या लग्नाचा किस्सा:नाटक कंपनी घेऊन रीवाला गेले होते पृथ्वीराज कपूर, तेथे आयजींची मुलगी पडली पसंत आणि बनवले सूनबाई

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज कपूर आणि कृष्णा राज यांचे लग्न कसे जमले होते जाणून घ्या..

बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांचा जून रोजी स्मृतीदिन होता. त्यांनी 1946 मध्ये कृष्णा मल्होत्रा यांच्याशी लग्न केले होते. दोघांच्या लग्नामागची कहाणी रंजक आहे. या दोघांचे लग्न नेमके कसे ठरले होते जाणून घेऊयात.

बातम्यांनुसार, मध्यप्रदेशातील रीवा येथील लोकांना रंगमंचाची ओळख व्हावी यासाठी पृथ्वीराज कपूर त्यांच्या नाटक कंपनीला घेऊन रीवा येथे गेले होते. त्यांची दोन मुले राज कपूर आणि शम्मी कपूर त्यांच्यासोबत तिथे गेले होते. त्यावेळी शम्मी यांचे वय 15 वर्षे तर राज कपूर 22 वर्षांचे होते.

ज्यावेळी पृथ्वीराज कपूर त्यांच्या नाटक कंपनीसोबत रीवामध्ये गेले होते, त्यावेळी तेथील आयजी करतार नाथ मल्होत्रा होते. पृथ्वीराज कपूर यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या टीमवर होती. या भेटीदरम्यान पृथ्वीराज कपूर आणि करतार नाथ मल्होत्रा यांच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर दोघांनी नात्यात करायचे ठरवले. पृथ्वीराज यांनी त्यांचे थोरले चिरंजीव राज कपूर यांचे लग्न करतार नाथ यांची कन्या कृष्णासोबत निश्चित केले. राज कपूर आणि कृष्णा मल्होत्रा यांचे लग्न मे 1946 मध्ये रीवा येथे झाले होते. राज कपूर यांची वरात रीवा येथे आली होती. येथील एका शासकीय बंगल्यावर दोघांचे लग्न झाले होते.

यासाठी मुलीचे नाव ठेवले रिमा
राजकपूर आणि कृष्णा कपूर यांनी त्यांच्या एका मुलीचे नाव रीवा या नावावरुन रीमा असे ठेवले होते. या दाम्पत्याला एकुण पाच अपत्ये आहेत. रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर ही त्यांच्या मुलांची
तर रीमा जैन आणि रीतू नंदा ही त्यांच्या मुलींची नावे.. ऋषी कपूर, राजीव कपूर आणि रीतू नंदा आता हयात नाहीत.

कृष्णा राज यांचे नातेवाईक होते प्रेम चोप्रा
अभिनेते प्रेम चेप्रा हे कृष्णा राज यांचे नातेवाईक आहेत. कृष्णा यांची बहीण उमा यांचे लग्न प्रेम चोप्रांसोबत झाले आहे. या नात्याने प्रेम चोप्रा कृष्णा यांचे मेहुणे होते. तर राज कपूर आणि प्रेमा चोप्रा यांच्या साडभावाचे नाते होते. कृष्णा आणि उमा यांना तीन भाऊ होते. प्रसिद्ध अभिनेते प्रेमनाथ, राजेंद्रनाथ आणि नरेंद्र नाथ ही त्यांच्या भावांची नावे. या नात्याने हे तिघेही राज कपूर आणि प्रेम चोप्रा यांचे मेहुणे होतात. कृष्णा राज कपूर यांचे 2018 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...