आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मुंबईत त्याचे ड्रीम होम बनवले आहे. या अभिनेत्याने अंधेरीच्या वर्सोवा भागातील यारी रोडवर बंगला बांधला असून त्याला जवळपास तीन वर्षे लागली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नवाजुद्दीनने त्याचे हे ड्रीम होम बनवण्यासाठी जवळपास 13 कोटी रुपये खर्च केले आहेत.
10 कोटींना खरेदी केली होती जमीन
जवळच्या सूत्राने सांगितले की, “नवाजुद्दीनला गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत बुढाणा येथील त्याच्या जुन्या घराची प्रतिकृती बनवायची होती. तो आपला जास्तीत जास्त वेळ याच शहरात घालवतो आणि म्हणूनच त्याला बुढाणासारखं घर मुंबईतही हवं होतं. मात्र, हे स्वप्न पूर्ण करणे सोपे नव्हते. मुंबईतील अंधेरी भागात मालमत्तेचे दर गगनाला भिडले आहेत जिथे नवाजने हे घर बांधले आहे, कारण ते शहरातील सर्वात पॉश एरियापैकी एक आहे.
नवाजने ही जमीन सुमारे 10 कोटी रुपयांना खरेदी केली होती, तर घराच्या बांधकाम आणि आतील भागावर 3 कोटी रुपये खर्च केले. नवाजुद्दीनचे हे स्वप्नातील घर आहे, त्यामुळे ते सजवण्यात त्याने कोणतीही कसर सोडलेली नाही. या घराबद्दल तो खूप भावूक आहे आणि आता घर तयार झाले आहे, तो आपला जास्तीत जास्त वेळ इथे घालवत आहे.
घरात 5 बेडरूम आहेत
5 बेडरूम व्यतिरिक्त, या ऑल व्हाइट रंगाच्या बंगल्यामध्ये 2 सर्वंट रूम, 1 थिएटर, 1 आलिशान लिव्हिंग रूम आणि 1 किचन आहे. वडिलांच्या स्मरणार्थ नवाजने या बंगल्याचे नाव 'नवाब' ठेवले आहे.
सध्या घराच्या नेम प्लेटचे काम सुरू आहे, लवकरच ते त्याच्या बंगल्याच्या गेटवर लावण्यात येणार आहेत. नवाबच्या वडिलांचे नाव नवाबुद्दीन सिद्दीकी असून ते आता या जगात नाहीत. ते व्यवसायाने शेतकरी होते. यामुळेच जेव्हाही नवाजला शूटिंगमधून ब्रेक मिळतो तेव्हा तो त्याच्या गावी जातो आणि शेती करतो.
एकेकाळी 5 लोकांसोबत शेअर करत असे अपार्टमेंट
15 वर्षांपूर्वी जेव्हा नवाज चित्रपटसृष्टीत स्थान मिळवण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आला तेव्हा त्याची प्रकृती अतिशय हलाखीची होती. एकदा तो म्हणाला होता, मुंबईच्या गोरेगाव भागात एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये आम्ही पाच जण राहत होतो. आम्ही सर्व कलाकार होते. आम्ही ट्रेन आणि बसने प्रवास करायचो आणि ऑडिशनला जायचो. आजही त्या परिसरातून गेल्यावर ते दिवस आठवतात.
जेव्हा नवाजच्या करिअरला सुरुवात झाली तेव्हा त्याने भाड्याने घर घेतले होते, पण 2016 मध्ये त्याने मुंबईत आपला अपार्टमेंट घेतला जो वर्सोवा भागात आहे. तेव्हा नवाजने सांगितले होते की, मला भाड्याच्या घरात राहण्यास काहीच अडचण नाही, पण पत्नीची इच्छा होती की स्वतःचे घर असायला हवे.
छायाचित्र-अजित रेडेकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.