आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुपरस्टार सलमान खानने अलीकडेच त्याचा बॉडीगार्ड शेरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो शेराच्या खांद्यावर हात ठेऊन उभा दिसतोय. सलमानने या फोटोला कॅप्शन दिले - प्रामाणिकपणा... कॅप्शनवरुन सलमानचा शेरावर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून येते. सलमान खान जिथे कुठे जातो, त्याचा बॉडीगार्ड शेरा नेहमी त्याच्यासोबत असतो.
गेल्या 24 वर्षांपासून शेरा सलमानच्या पाठीशी सावलीसारखा उभा आहे. गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा हा सलमान खानसाठी एक कर्मचारी नाही तर कुटूंबातील सदस्य झाला आहे. शेरा आता बॉलिवूडमधील लोकप्रिय बॉडीगार्ड झाला आहे. चला जाणून घेऊयात त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी -
सलमानसाठी पाच-पाच किलोमीटर पायी देखील चालतो शेरा
समलान खानला ज्या ठिकाणी जायचे असते, त्या ठिकाणाची परिस्थिती शेरा एकदिवस पहिलेच जाणून घेतो. अनेक वेळा त्याला रस्ता क्लिअर करण्यासाठी पाच-पाच किलोमीटर पायी चालावे लागते. एकदा शेरा रस्ता क्लिअर करण्यासाठी कारमधून उतरुन 8 किलोमीटर पायी चालला होता.
एका प्रसिध्द वेबसाइटच्या रिपोर्टनुसार सलमानला सिक्योरिटी देण्याच्या बदल्यात शेरा जवळपास 2 कोटी रुपये घेतो. म्हणजे त्याला महिन्याचे 16.50 लाख रुपये मिळतात.
शेरा असा बनला सलमानचा बॉडीगार्ड
शेराला बालपणीपासूनच बॉडी बिल्डींगचा आवड आहे. त्यामुळेच तो 1987 मध्ये ज्यूनिअर मिस्टर मुंबई आणि त्याच्या पुढच्या वर्षी ज्यूनिअर वर्गात मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवडला गेला. शिख कुटुंबात जन्मलेल्या शेराच्या वडिलांचे मुंबईमध्ये गाडी रिपेअर करण्याचे वर्कशॉप होते. परंतु घरात एकुलता एक असलेल्या शेराने वेगळे क्षेत्र निवडले. एका मित्राच्या सांगण्यावरून शेराने सिनेसृष्टीतील कलाकार आणि बिझनेमन यांच्या सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला शेरा काही बॉलिवूड कलाकारांसोबत हॉलिवूड कलाकारांनासुध्दा भारतात शूटिंगला आल्यानंतर सुरक्षा देऊ लागला.
1995 हे वर्षे त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. सोहेल खानने शेराकडे सलमानसाठी परदेशी दौ-यासाठी सुरक्षा मागितली. त्याच्या कामाने प्रभावित झालेल्या सलमानने त्याला नेहमीसाठी आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवले. त्यानंतर तो सलमानच्या घरातील सदस्य बनला. सलमानला चाहत्यांच्या गर्दीतून सुरक्षित बाहेर काढताना शेराला आपल्या डोक्यावरील पगडी अडथळा निर्माण करत असल्याचे जाणवले. त्याने कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या केसांची कुर्बानी दिली.
एकेकाळी सलमानचा शेजारी होता शेरा
शेरा म्हणतो की, तो एका मित्राप्रमाणे सलमानच्या पाठीशी असतो. शेरा मुंबईमध्ये सलमानच्या शेजारी राहायचा. यानंतर त्याचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या सांगण्यावरुण शेराने विजक्रॉफ्ट इव्हेंट कंपनी उघडली. यासोबतच 'टायगर सिक्योरिटी' ही त्याची एक कंपनी आहे, ही कंपनी स्टार्सला सुरक्षा पुरवते. शेरा सलमानला भाई म्हणतो. शेरा भारतात येणा-या हॉलिवूड स्टार्सला सुरक्षा देतो.
'मी भाईची साथ कधीच सोडणार नाही'
शेरानुसार, "मी सलमान भाईच्या कुटूंबाचा सदस्य आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो. मी गेल्या 24 वर्षापासून भाईसोबत आहे. तो खुप मोठा माणूस आहे. खूप वर्षांपू्र्वी सोहेल भाईने मला ऑफिसमध्ये बोलावले होते. कारण सलमान भाईच्या बाहेरच्या शोजला सिक्योरिटी पाहिजे होती. मी सोहेल भाईसोबत बोललो त्यानंतर त्यांनी मला सांगितेल की, तूच सलमान भाईसोबत बाहेरच्या शोजच्या सिक्योरिटीला जाशील. त्यावेळी मी हो म्हणालो आणि तेव्हापासून मी भाईची सुरक्षा करतोय. मी त्यांना कधीच सोडले नाही आणि सोडणारही नाही.
भाईसारखी फॅन फॉलोइंग पाहिली नाही
मी भाईसारखी फॅन फॉलोइंग कधीच पाहिली नाही. सलमान भाईने आम्हाला नेहमी सांगितले आहे की, गर्दीत कुणीही असले तरी त्यांना इजा होऊ नये. भाईला चॅरिटी आणि कुटूंबावर खुप प्रेम आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.