आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी सिन्हाचे नाते झाले ऑफिशिअल:2 अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये, जाणून घ्या कोण आहे झहीर इक्बाल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'डबल एक्सएल'मध्ये सोनाक्षी आणि इक्बाल एकत्र दिसणार आहेत

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून झहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दोघांपैकी कोणीही याबाबत उघडपणे बोलले नसले तरी नुकताच दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावरून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे त्यांच्या चाहत्यांना स्पष्ट झाले आहे.

झहीरने पोस्ट शेअर करून नाते अधिकृत केले
व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा फ्लाइटमध्ये स्नॅक्स खाताना दिसत आहे. तिच्यावरचे आपले प्रेम व्यक्त करताना झहीरने कॅप्शनमध्ये लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा सोन्ज... मला न मारल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो... येणाऱ्या काळात आपण हसत, खात आणि आनंदाने राहुयात."
या पोस्टवर सोनाक्षीने दिली आहे प्रतिक्रिया

झहीर इक्बालच्या पोस्टनंतर सोनाक्षीने त्यावर कमेंट केली आहे. तिने लिहिले, "धन्यवाद... लव्ह यू... आता मी तुला मारायला येत आहे." झहीरने सोनाक्षीसोबतचे आपले नाते सार्वजनिक केल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने विचारले, 'लग्न कधी आहे?' त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, 'तुम्ही दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहात.' वरुण शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि पत्रलेखा या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, झहीर इक्बाल सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. सोनाक्षीचे चाहते झहीरबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे झहीर इक्बाल?

कोण आहे झहीर इक्बाल?
झहीर इक्बालचा जन्म 10 डिसेंबर 1988 रोजी मुंबईत झाला. झहीर हा ज्वेलर्स कुटुंबातील आहे. त्याचे वडील इक्बाल रत्नासी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जवळचे मित्र आहेत. याच कारणामुळे सलमानने झहीरला 2019 मध्ये सिनेसृष्टीत लाँच केले होते. 'नोटबुक' हे झहीरच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते. हा चित्रपट 'टीचर्स डायरी' या हॉलिवूड चित्रपटावर बेतला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

यापूर्वी 2 अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे झहीरचे नाव

सोनाक्षीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी झहीरचे नाव 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लेकर हम दिवाना दिल' फेम दिक्षा सेठसोबत जोडले गेले होते. यानंतर झहीरचे नाव सना सईद हिच्यासोबतही जोडले गेले. सना 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटात झळकली होती. मात्र झहीर याबद्दल कधीच उघडपणे बोलला नाही.

'डबल एक्सएल'मध्ये सोनाक्षी आणि इक्बाल एकत्र दिसणार आहेत
झहीर हा ज्वेलर्स कुटुंबातील असून तो लहानपणापासून सलमान खानचा चांगला मित्र आहे. झहीरने सलमान खानच्या 'द नोटबुक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर सोनाक्षी आणि झहीर लवकरच आगामी डबल एक्सएल चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सतराम रमानी दिग्दर्शित या चित्रपटात हुमा कुरैशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...