आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक केके मृत्यू प्रकरण:नजरुल स्टेजवर पुरेशी जागा होती, आमच्याकडे कॉन्सर्टचे व्हिडिओ आहेत - कोलकाता पोलीस आयुक्त

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहाय्यक आयुक्त तिथे उपस्थित होते

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ ​​केके यांचे 31 मे रोजी कोलकाता येथे निधन झाले. केके कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर या कॉन्सर्टवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी आता कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल म्हणाले की, नजरुल मंच येथे जागेची कोणतीही अडचण नव्हती.

सहाय्यक आयुक्त तिथे उपस्थित होते
विवीत गोयल म्हणाले, नक्कीच नजरुल मंचावर कदाचित गर्दी असेल, पण परिस्थिती नियंत्रणात होती. जागेची अडचण किंवा लोकांना घाम येणे अशा समस्या उद्धभवण्यासारखी तिथे परिस्थिती नव्हती. केके त्यांच्या शेवटच्या परफॉर्मन्ससाठी संध्याकाळी 6.22 वाजता नजरुल मंच येथे दाखल झाले आणि 7.05 वाजता स्टेजवर आले. यावेळी तेथील सुरक्षा व्यवस्था कडक होती. केके येण्यापूर्वी सहाय्यक आयुक्तही नजरुल मंचावर हजर होते.

आता कार्यक्रमस्थळी डॉक्टरांची टीम असेल
कॉन्सर्टच्या वादावर आयुक्त म्हणाले, आमच्याकडे शोचे व्हिडिओ आहेत, त्यात लोक आरामात उभे राहून मैफलीचा आनंद लुटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती तिथे दिसली नाही. नजरुल मंच याठिकाणी 2500 जागा आहेत, बहुतेक लोक त्यांच्या सीटसमोर उभे होते.

गोयल पुढे म्हणाले, आमची विनंती आहे की यापुढे एक डॉक्टर आणि एक वैद्यकीय रुग्णवाहिका घटनास्थळी ठेवावी जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत लोकांना नेले जाईल. यासोबतच कोणत्याही ठिकाणी आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...