आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'ये है मोहब्बतें' आणि 'नागिन 3' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जी नुकतीच विवाहबंधनात अडकली. चिराग बाटलीवालासोबत कृष्णा विवाहबद्ध झाली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या ग्रँड वेडिंग सेरेमनीचे फोटो पोस्ट करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
बीचवर बंगाली पद्धतीने झाले लग्न
अभिनेत्री कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवाला यांनी गोव्यातील समुद्रकिनारी बंगाली रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नात अभिनेत्रीने पारंपरिक बंगाली साडी परिधान केली होती. कृष्ण साडीसोबत पारंपरिक मुकुटमध्ये दिसली. चिराग हा व्यवसायाने सेलर आणि ड्रोन पायलट आहे.
हळद-मेंदीनंतर झाली टोमॅटिना पार्टी
लग्नाच्या कार्यक्रमात मेंदी आणि हळदी विधीनंतर कृष्णाने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' स्टाइलमध्ये टोमॅटिना पार्टीही दिली. गेल्या वर्षी या जोडप्याने थायलंडमध्ये बॅचलोरेट पार्टी केली होती. कृष्णा आणि चिराग बाटलीवाला यांचा गेल्यावर्षी साखरपुडा झाला होता. डिनरसाठी हे कपल पारसी आउटफिटमध्ये दिसले.
कृष्णा मुखर्जीची कारकीर्द
कृष्णा मुखर्जीने 2014 मध्ये 'झल्ली अंजली' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात कृष्णाने शीनाची भूमिका साकारली होती. कृष्णाने 'ये है मोहब्बतें'मध्ये आलिया राघव भल्ला आणि 'कुछ तो है: नागिन एक नए रंग में'मध्ये प्रिया रेहान सिंघानियाची भूमिका साकारली होती. तर 'शुभ शगुन'मध्ये ती शगुन शिंदे जैस्वालच्या भूमिकेत दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.