आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटायगर श्रॉफची बहीण कृष्णा लॉकडाऊन झाल्यापासून तिचा प्रियकर इबन हायम्ससोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. दोघेही कधी वर्कआऊट करताना तर कधी मजामस्ती करताना दिसतात. अलीकडेच कृष्णाने दोघांची काही रोमँटिक छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
लॉकडाऊनपासूनच एबन कृष्णाच्या कुटूंबियांसोबत त्यांच्या मुंबईच्या घरी थांबला आहे, याकाळात हे दोघेही त्यांची लॉकडाऊन डायरी शेअर करत आहेत. कृष्णाने अलीकडेच बॉयफ्रेंडचे चुंबन घेतानाचे आणि त्याच्यासोबत एन्जॉय करणारे काही फोटो शेअर केले आहेत. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.
कुटुंबाची दोघांच्या नात्याला परवानगी
कृष्णा दीर्घ काळापासून फुटबॉलपटू इबन हायम्ससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा कृष्णाला तिच्या आणि इबनच्या नात्याबद्दल कुटुंबाचे मत काय आहे, हे विचारले असता तिने सांगितले होते की, तिच्या निर्णयावर तिच्या पालकांना पूर्ण विश्वास आहे. त्यांना फक्त त्यांच्या मुलांना आनंदी पहायचे आहे. त्याचबरोबर जेव्हा तिला लग्नाविषयी विचारणा केली गेली, तेव्हा तिने सांगितले की ती सध्या लग्नाचा विचार करीत नाही, हळूहळू त्यांचे नाते पुढे नेऊ इच्छित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.