आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअपवर खुलासा:कृष्णा श्रॉफने इबनसोबतच्या ब्रेकअपमागचे सांगितले कारण, म्हणाली - कपलपेक्षा आम्ही एकमेकांचे चांगले मित्रच होऊ शकतो याची जाणीव झाली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रेकअपमागे अनेक कारणे आहेत.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचे अलीकडेच बॉयफ्रेंड इबन हायम्ससोबत ब्रेकअप झाले. याचा खुलासा स्वतः कृष्णाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. सोबतच इबनसोबतचे आपले सर्व फोटोदेखील तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काढून टाकले होते. आता कृष्णाने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इबनसोबतच्या ब्रेकअपवर आपले मौन सोडले आहे.

मुलाखतीत कृष्णा म्हणाली, 'ब्रेकअपमागे अनेक कारणे आहेत. मात्र मी ही गोष्ट प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न केला. याच काळात रिलेशनमध्ये राहण्यापेक्षा आम्ही एकमेकांचे चांगले मित्रच होऊ शकतो, याची जाणीव आम्हाला झाली', असे कृष्णा म्हणाली.

आता स्वतःकडे नीट लक्ष देणार

कृष्णा पुढे म्हणाली, 'एकटं राहण्यातदेखील तितकाच आनंद आहे. कारण आता मी स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकते. रिलेशनशिपमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे आज मला हे छान आयुष्य जगता येत आहे. काही कारणामुळे एवन हायम्स आणि माझ्या नात्यात कटुता आली होती,' असे तिने सांगितले.

पुढे ती म्हणते, 'आजही मी आणि एवन एकमेकांच्या संपर्कात आहोत. पण, पूर्वी सारखे आमचे बोलणे होत नाही. ब्रेकअप होऊन जवळपास एक महिनाच झाला आहे. त्यामुळे आता मला फक्त स्वत:साठी वेळ द्यायचा आहे. त्यामुळे डेटिंग, प्रेम याविषयी काही ठरवले नाहीये. 2021 मध्ये मला संपूर्ण जग फिरण्याची इच्छा आहे.'

कृष्णा आणि इबान यांची पहिली भेट 2019 मध्ये झाली होती
कृष्णा आणि इबनची भेट 11 मे 2019 रोजी मुंबईतील एका मित्राच्या घरी पहिल्यांदा झाली होती. एका महिन्यानंतर, दोघांनीही डेटिंग करण्यास सुरुवात केली. या दोघांनीही सोशल मीडियावर वन इयर अॅनिव्हर्सरी साजरी केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये कृष्णाने सोशल मीडियावर आपल्या ब्रेकअपबद्दल सांगितले. ती म्हणाली होती की, इबन आणि मी आता रिलेशनशिपमध्ये नाहीये. पण, त्यावेळी तिने ब्रेकअपमागचे कारण सांगितले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...