आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटण्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल करुन तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. यानंतर आता सुशांतचे मित्रमैत्रिणीदेखील रियाविरोधात अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत.
आता सुशांतची जवळची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री क्रिसन बॅरेटो हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन रियाला लक्ष्य केले आहे. आणि तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. रियाची सुशांतच्या आयुष्यात एंट्री झाल्यानंतर काय घडले, हे क्रिसनने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
क्रिसनने लिहिले की, 'सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. सुशांत आणि आमचा संपर्क कमी झाला. रिया कधीच त्याला कोणत्या मित्र-मैत्रिणींसोबत जास्त बोलू देत नव्हती. त्याचा फोन नंबरदेखील सतत बदलत रहायचा. त्यामुळे त्याचे आणि आमचे बोलणे होत नव्हते.' क्रिसनने सांगितल्यानुसार, सुशांतसोबतची तिची शेवटची भेट 5 एप्रिल 2019 रोजी झाली होती.
क्रिसन पुढे सांगते, 'सुशांत, त्याची बहीण (प्रियांका सिंह), त्याचे मेहुणे आणि मी-आम्ही सर्वांनी त्याच्या पाली हिलच्या घरी मस्त वेळ घालवला. आम्ही काम आणि आयुष्याबद्दल बोलायचो.'
'सुशांत आणि माझे काही कॉमन फ्रेंड्स होते, ज्यांना भेटण्यासाठी आम्ही प्लान करणार होतो. मात्र परिस्थिती वेगाने बदलली आणि सुशांत संपर्कात राहिला नाही. आम्हाला वाटतं की सुशांत अजूनही प्रेमात आहे आणि हनीमून फेजमधून जातोय. पण असं कधी घडलं नव्हतं. मी सुशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला पण कुणाकडून त्याचा नंबर मिळाला नाही. यावर्षी मार्चमध्ये मी त्याला इंस्टाग्रामवरही निरोप दिला होता पण त्याने त्यावर रिप्लाय केला नाही', असे क्रिसनने सांगितले.
24 वर्षीय क्रिसनने पुढे रियाबद्दल लिहिले की, 'मी रियाला कधीच भेटले नाही. पण तिच्यामुळे सुशांतमध्ये झालेले बदल आम्हाला दिसून येत होते. सुशांतच्या वडिलांनी देखील सांगितले की सुशांत आणि कुटुंबीयांचे बोलणे होत नव्हते. सुशांतने आम्हाला मोठी स्वप्न पाहायला शिकवले पण रिया आली आणि सगळंच बदलले.
'मला माहित आहे की काही लोक तोंड उघडत नाहीत कारण त्यांना त्यांचे करिअर उद्धवस्त होण्याची भीती वाटते. जेव्हा मी माझे म्हणणे सर्वांसमोर मांडले, तेव्हा मलादेखील लोकांकडून कॉल आले. मलाही भीती वाटत आहे. जर हे सर्व सुशांतसोबत होऊ शकते तर कुणासोबतही काहीही होऊ शकते', अशी भीती क्रिसनने व्यक्त केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.