आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा चित्रपट नवी जोडी:शाहिद कपूर आणि क्रिती सेननचा रोमँटिक अंदाज, अनटाइटल्ड फिल्ममध्ये धर्मेंद्र-डिंपल कपाडिया यांच्याही मुख्य भूमिका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सेनन अभिनेता शाहिद कपूरसोबत आता स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही जोडी लवकरच नव्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या नवीन चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. क्रिती आणि शाहिदच्या या आगामी चित्रपटाची टॅगलाइन 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' अशी आहे. पोस्टरवर दिसणारी दोघांची जबरदस्त केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे.

अद्याप शीर्षक ठरलेले नाही
समोर आलेल्या नवीन पोस्टरमध्ये शाहिद आणि क्रिती एका बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. या पोस्टरवर चित्रपटाचे नाव लिहिलेलं दिसत नाही पण या चित्रपटाची 'अ‍ॅ​​​​​न इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' ही टॅगलाइन लिहिलेली दिसत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे क्रितीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. क्रिती आणि शाहिद यांच्यासोबत धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया हे कालकार देखील या आगामी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

शाहिद आणि क्रितीच्या या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अमित जोशी आणि आराध्या शहा असून दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर हे निर्माते आहेत. अद्याप शीर्षक न ठरलेला हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.