आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिती सेननवरुन हटणार नाही नजर:ग्लॅमरस लूकमध्ये दिसली क्रिती, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पटकावला फिल्मफेअर अवॉर्ड

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील डिमांडिंग अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच क्रितीला 67 व्या फिल्मफेअरमध्ये पुरस्कार सोहळ्यात मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मात्र, रेड कार्पेटवर पुरस्कारापेक्षा तिच्या ग्लॅमरस लूकचीच जास्त चर्चा झाली.

क्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लूकचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले असून त्यावर चाहते लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

कृती मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित फिल्मफेअर अवॉर्ड्स शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने रेड कलरचा डीप नेक, हाय थाय स्लिट आउटफिट परिधान केला होता.

यासह तिने केस मोकळे सोडले होते. सोबत डायमंड नेकपीस, लाल लिपस्टिक आणि मॅचिंग हील्ससह तिने तिचा लूक पूर्ण केला. क्रिताचा हा ग्लॅमरस ड्रेस स्टुबला ब्रँडचा आहे, सुकृती ग्रोव्हरने तो डिझाइन केला आहे.

क्रितीचा हा रेड आउटफिट लूक अतिशय एलिगंट आणि क्लासी क्लासी दिसतोय, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय.

रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
रणवीर सिंहला ‘83’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि कृती सेननला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. यावर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘शेरशाह’ चित्रपटाने जिंकला आहे.

यांनाही मिळाले वेगवेळ्या भागात पुरस्कार -

 • सर्वोत्तम अभिनेता (क्रिटीक) : विकी कौशल (सरदार उधम)
 • सर्वोत्तम अभिनेत्री (क्रिटीक) : विद्या बालन (शेरनी)
 • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी (मिमी)
 • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री : सई ताम्हणकर (मिमी)
 • सर्वोत्तम अभिनेता (पदार्पण)-मेल : इहान भट्ट (99 साँग्स)
 • सर्वोत्तम अभिनेत्री (पदार्पण) : शर्वरी वाघ (बंटी और बबली)
 • सर्वोत्तम दिग्दर्शक : विष्णुवर्धन (शेरशाह)
 • सर्वोत्तम दिग्दर्शक (पदार्पण) : सीमा पाहवा (रामप्रसाद की तेरहवीं)
 • सर्वोत्तम कथा : अभिषेक कपूर, सुप्रतिक सेन, तुषार परांजपे (चंडीगढ करे आशिकी)
 • सर्वोत्तम चित्रपट (क्रिटीक) : सरदार उधम (सुजित सरकार)
 • सर्वोत्तम गायक : बी प्राक (मन भरया...) (शेरशाह)
 • सर्वोत्तम गायिका : असीस कौर (रातां लम्बियां...) (शेरशाह)
 • सर्वोत्तम म्यूझिक अल्बम : तनिष्क बागची, बी प्राक, जानी, जसलीन रॉयल, जावेद- मोहसीन, विक्रम मोंटरोसे (शेरशाह)
 • सर्वोत्तम गीतकार - कौसर मुनीर (लहरा दो....) (83)
 • बेस्ट स्क्रीनप्ले : शुभेंदू भट्टाचार्य, रितेश (सरदार उधम)
 • सर्वोत्तम संवादाचा पुरस्कार: वरुण ग्रोव्हर, दिबाकर बनर्जी (संदीप और पिंकी फरार)
 • सर्वोत्तम ध्वनीमुद्रण : दीपांकर चाकी (सरदार उधम)
 • सर्वोत्तम संपादन : ए श्रीकर प्रसाद (शेरशाह)
 • बेस्ट अ‍ॅक्शन : स्टीफन रिकटर, सुनील रोड्रिग्स (शेरशाह)
 • बेस्ट बॅकग्राऊंड स्कोअर : शांतनु मोइत्रा (सरदार उधम)
 • बेस्ट कॉस्च्यूम डिझाइन: वीरा कपूर (शेरशाह)
 • बेस्ट सिनेमेटोग्राफी : अविक मुखोपाध्याय (सरदार उधम)
 • बेस्ट कोरिओग्राफी : विजय गांगुली (चकाचक....) (अतरंगी रे)
 • बेस्ट वीएफएक्स : (विजुअल इफेक्ट्स) (सरदार उधम)
 • बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन : मानसी ध्रुव मेहता, डिमित्री मैलिच (सरदार उधम)
 • लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: दिग्दर्शक व निर्माता सुभाष घई
बातम्या आणखी आहेत...