आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्दर्शक ओम राऊतच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर 9 मे रोजी मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. यानिमित्ताने एका ग्रँड इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या साधेपणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
चक्क जमिनीवर बसली क्रिती
‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमधील क्रितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत कृती चक्क जमिनीवर बसून चित्रपटाचा ट्रेलर बघताना दिसतेय.
झालं असं की. मुंबईत एका चित्रपटगृहात आदिपुरुषचा ट्रेलर लाँच इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी चाहते, मीडिया आणि चित्रपटातील इतर सहकाऱ्यांनी गर्दी केली होती. यानंतर आलेल्या क्रितीला संपूर्ण चित्रपटगृहात बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध नव्हती, परंतु जराही विचार न करता ती थेट जमिनीवर बसली. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तिला खुर्चीवर बसण्याची विनंती केली, पण तिने जमिनीवर बसणे पसंत केले आणि सर्वांची मने जिंकली. क्रितीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत. क्रितीची ही कृती पाहून चाहते तिला डाऊन टू अर्थ म्हणत आहेत.
पारंपरिक साडीत दिसली क्रिती
‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लॉंचिंगसाठी क्रिती सेननने खास लूक केला होता. क्रितीने यावेळी ऑफ व्हाइट कलरची साडी नेसली होती. तर केसांचा अंबाडा घातला होता. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसली.
16 जून रोजी प्रदर्शित होतोय चित्रपट
या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेननने माता सीतेची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2 डी, 3 डी, आयमॅक्स सारख्या फॉर्मेटमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट जगभरातील सुमारे 20 हजार पडद्यावर 16 जून रोजी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
प्रतीक्षा संपली:बहुचर्चित 'आदिपुरुष'चा ट्रेलर आला भेटीला, वादानंतर नवीन बदलांसह निर्मात्यांनी 70 देशांत रिलीज केला ट्रेलर
ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी, सीतामातेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागेची झलक पाहायला मिळतेय. मुंबईतील PVR जुहू येथे चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच इव्हेंट ठेवण्यात आला. येथे चाहत्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर डिजिटली रिलीज करण्यात आला. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.