आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची इच्छा:कृती सेनॉनला आदिपुरुषकडून राष्ट्रीय पुरस्काराची अपेक्षा, चित्रपटात साकारणार आहे सीतेची भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृतीला 'आदिपुरुष'कडून अपेक्षा आहेत.

अभिनेत्री कृती कृष्ण सेनॉन सध्या आपल्या ब-याच प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती सध्या अरुणाचल प्रदेशात वरुण धवनसोबत भेडिया चित्रपटाचे शूटिंग करत आहे. 10 एप्रिलला याचे पूर्ण होताच ती प्रभास स्टारर 'आदिपुरुष'वर काम करणार आहे. त्याशिवाय तिच्याकडे आणखी एक चित्रपट आहे. त्याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याच्यावर काम सुरु झाले आहे.

दरम्यान, कृतीने चित्रपटांच्या शूटिंगमधून थोडा वेळ काढून एका प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केले आहे. सध्या तिच्या खात्यात सुमारे सात चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याला कुठल्या तरी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिले, असे तिला वाटते.

कृतीला 'आदिपुरुष'कडून अपेक्षा आहेत. यात ती सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता सात सिनेमांपैकी कोणता सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देतो, हे पाहणे आत्सुक्याचे ठरेल. खरंतर, 'आदिपुरुष', 'भेडिया'बरोबरच 'बच्चन पांडे', 'मिमी', 'गणपत', 'हम दो हमारे दो' सारखे चित्रपटदेखील तिच्या हातात आहेत.

बातम्या आणखी आहेत...