आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRKने अर्जुन कपूरला म्हटले सर्वात मोठा फ्लॉप अभिनेता:कतरिनाच्या नावाने विकी कौशलला केले ट्रोल

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंघोषित समीक्षक KRK त्याच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा विधानांमुळे नेहमीच वादाला तोंड फोडत असतो. आता अलीकडेच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अर्जुन कपूरला सर्वात मोठा फ्लॉप अभिनेता म्हणून घोषित केले आहे. केआरकेने कतरिना कैफचे नाव घेऊन विकी कौशललाही ट्रोल केले आहे. याशिवाय त्याने वरुण धवन आणि आयुष्मान खुराणा यांच्यावरही भाष्य केले आहे. केआरकेने आयुष्मानला डबल ढोलकी आणि वरुणला 'डेव्हिडचा मुलगा' म्हणत ट्रोल केले.

सोशल मीडियावर सर्वेक्षण केले

कमाल राशीद खान उर्फ ​​केआरके हा बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांवरील वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. तो सतत अशा काही कमेंट करत असतो, ज्यामुळे वाद निर्माण होतो. आता अलीकडेच त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये त्याने नेटक-यांना बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉपस्टार कोण, असा प्रश्न विचारला. या प्रश्नासोबत त्याने तीन पर्याय ठेवले होते ज्यात त्याने विकी कौशल, वरुण धवन आणि आयुष्मान खुराणा यांच्या नावाचा समावेश केला होता. केआरकेने या तिघांना सेल्फ क्लेम्ड आणि डी ग्रेड अभिनेते म्हटले आहे.

विकी कौशलला म्हटले - 'कतरिना वाला'
KRK ने आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्याने अर्जुन कपूरला सर्वात मोठा फ्लॉप अभिनेता म्हणून घोषित केले आणि त्याच्या सोशल मीडिया सर्वेक्षणाचा निकाल सांगितला. याशिवाय त्याने विकी कौशलला 'कतरिना वाला' म्हणत ट्रोल केले आहे. केआरकेने आयुष्मानला डबल ढोलकी आणि वरुण धवनला डेव्हिड धवनचा मुलगा म्हणून संबोधले आहे.

अर्जुन कपूर हा सर्वात मोठा फ्लॉपस्टार - KRK

KRK ने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले- "सर्वेक्षण रेटिंगनुसार, अर्जुन कपूर बॉलिवूडच्या फ्लॉप कलाकारांच्या यादीत बी-टाऊनचा सर्वात मोठा फ्लॉपस्टार आहे... 1. अर्जुन कपूर, बोनीचा मुलगा 2. वरुण, डेव्हिडचा मुलगा 3. विकी 'कतरिनावाला' 4. आयुष्मान द डबल ढोलकी"

बातम्या आणखी आहेत...