आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात 10 दिवसांत KRK ची 20% स्मरणशक्ती गेली:म्हणाला- मी मेलो तर लक्षात ठेवा, सुशांतसोबतही असेच झाले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच तुरुंगातून बाहेर आलेला चित्रपट समीक्षक कमाल आर खान (KRK) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या ट्विटद्वारे नेहमीच वेगवेगळे वाद निर्माण करणाऱ्या केआरकेने यावेळी धक्कादायक दावा केला आहे. केआरकेनुसार, 10 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची 20% स्मरणशक्ती गेली आहे, जी परत येणार नाही. यादरम्यान केआरकेने स्वत:ची तुलना सुशांत सिंह राजपूतशी केली असून त्याचा मृत्यू झाल्यास तेच लोक जबाबदार असतील, जे सुशांतच्या मृत्यूला जबाबदार होते, असे म्हटले आहे.

स्वतःची तुलना सुशांतशी केली
केआरकेने ट्विट करून म्हटले आहे की, 'जेलमध्ये माझी 20 टक्के स्मरणशक्ती गेली आहे, जिथे मी 10 दिवस काहीही न खाता राहिलो आहे. माझ्या डॉक्टरांच्या मते, मी आता माझी स्मरणशक्ती परत मिळवू शकत नाही आणि भविष्यात आणखी स्मरणशक्ती गमावू शकतो. जर मी मेलो तर जनतेने हे लक्षात ठेवावे की, या लोकांनी यापूर्वी सुशांत सिंह राजपूतसोबत असेच केले होते आणि आता ते माझ्यासोबत करत आहेत.'

सोशल मीडियावर होत आहे ट्रोल
केआरकेचे ट्विट येताच, अनेक युजर्सला हे जाणून घ्यायचे आहे की, केआरके कोणाकडे इशारा करत आहे. तर अनेकजण त्याला जोरदार ट्रोल देखील करत आहेत. बरेच लोक केआरकेला अटेंशन सीकर आणि नौटंकी देखील म्हणत आहेत.

केआरके बॉलिवूडच्या ए-लिस्टर्सना टार्गेट करत राहतो
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून, KRK त्याच्या व्हिडिओ आणि ट्विटद्वारे सतत बॉलिवूडच्या ए-लिस्टर्स आणि प्रसिद्ध कलाकारांना लक्ष्य करतो आहे. या लोकांमध्ये केआरकेने सलमान खान आणि महेश भट्ट यांच्या नावाचाही समावेश केला आहे.

2 प्रकरणात अटक करण्यात आली होती
गेल्या महिन्यातच KRK ला 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे अटक करण्यात आली होती. त्या ट्विटमध्ये केआरकेने दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरले होते. याशिवाय एका अभिनेत्रीनेही त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. नंतर, या दोन्ही प्रकरणात त्याला 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला.

केआरके आता रिव्ह्यू करणार नाही
आपल्या रिव्ह्यूमुळे चर्चेत असलेल्या केआरकेने आता रिव्ह्यू करणे बंद केले आहे. केआरकेने अलीकडेच दिव्य मराठीशी संवाद साधताना सांगितले होते की, तो विक्रम वेधचा शेवटचा रिव्ह्यू करणार आहे. यानंतर रिव्ह्यू करण्याऐवजी तो आता प्रॉडक्शनमध्ये उतरणार आहे. रिव्ह्यू बंद करण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, रिव्ह्यूसाठी अनेक प्रसिद्ध लोक आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.

बातम्या आणखी आहेत...