आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:चित्रपटाचे समीक्षण करताना केआरकेने उडवली 'गुलाबो सीताबो'ची खिल्ली, दिग्दर्शक शुजित सरकार यांनी दिले भन्नाट उत्तर  

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गुलाबो सीताबो' हा चित्रपट पाहून केआरकेने चित्रपटगृहात तो प्रदर्शित न केल्याबद्दल दिग्दर्शकाचे आभार मानले आहे.

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा स्टारर 'गुलाबो सीताबो'  हा चित्रपट 12 जून रोजी रिलीज झाला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. पण केआरकेला हा चित्रपट अजिबात आवडलेला दिसत नाहीये. नेहमीप्रमाणे कमल राशिद खानने आपल्या ट्विटरवर चित्रपटाचे समीक्षण लिहिताना त्याची खिल्ली उडविली आहे, ज्याला दिग्दर्शक शुजित सरकार यांनी भन्नाट उत्तर दिले आहे.

  'गुलाबो सीताबो' हा चित्रपट पाहून केआरकेने चित्रपटगृहात तो प्रदर्शित न केल्याबद्दल दिग्दर्शकाचे आभार मानले आहे. त्याने चित्रपटावर टीका करताना लिहिले, 'गुलाबो सीताबो पाहिल्यानंतर, मी दिग्दर्शक शुजित सरकारला विचारू इच्छितो की, सर तुम्हाला काय हवे होते? खरंच तुमचा हेतू काय होता? बघणा-यांचा आत्मा काढू इच्छिता होता का? चित्रपटगृहात तो प्रदर्शित केला नाही याबद्दल धन्यवाद', असे केआरकेने आपल्या समीक्षणात म्हटले आहे. 

केआरकेच्या ट्विटला दिग्दर्शक शुजित सरकार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. 'सर, तुम्ही माझ्या प्रत्येक चित्रपटावर इतके प्रेम करता की, त्यामुळे मी खूप भारावून जातो. चित्रपट बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुढच्या चित्रपटाच्या वेळी पुन्हा इथेच भेटू', असे शुजित यांनी केआरकेला म्हटले आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी लखनौच्या मिर्झा शेखची भूमिका साकारली आहे. त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. तर आयुष्मान खुराणानेही त्यांना उत्तम साथ दिली आहे.  चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...