आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाचे आभारी आहेत कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह:म्हणाले - आईच्या निधनानंतर मामाने आम्हाला खूप मदत केली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या मामा गोविंदाबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, वाईट काळात मामा गोविंदाने त्यांना आर्थिक मदत केली होती. आईचे निधन झाल्यानंतर पैशांअभावी कृष्णा आणि आरती यांना त्यांचे राहते घर विकावे लागले होते. आता कृष्णा आणि आरती यांचे मामा गोविंदा यांच्याशी चांगले संबंध नसले तरी एकेकाळी या तिघांमध्ये खूप चांगले बाँडिंग होते.

एका खोलीच्या घरात राहात होते आरती आणि कृष्णा
बॉलिवूड बबलसोबत बोलताना कृष्णा आणि आरती यांनी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्याकाळी त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. आरती म्हणाली, आमच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी आम्हाला वाढवले. त्यांना काही काम करायला वेळ मिळत नव्हता. जुहूमध्ये आमचा एक मोठा फ्लॅट होता, जो आम्हाला विकावा लागला आणि आम्ही डीएन नगरमध्ये एका खोलीच्या घरात शिफ्ट झालो. पप्पांनी ते पैसे घर चालवण्यासाठी वापरले.

कृष्णा अभिषेक त्याची बहीण आरती सिंह
कृष्णा अभिषेक त्याची बहीण आरती सिंह

गोविंदाने कठीण काळात भावंडांना साथ दिली
कृष्णाने सांगितल्यानुसार, त्यांचे मामा गोविंदा त्यांना दर महिन्याला 2000 रुपये द्यायचे. कृष्णा म्हणाला, "मी त्यावेळी कॉलेजमध्ये होतो आणि आरती लखनऊमध्ये शाळेत होती. मामा आरतीलाही पैसे द्यायचे. त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे." गोविंदा त्यांच्या शाळेच्या फीपासून महिन्याभराचा इतर खर्च उचलायचे, असेही कृष्णाने सांगितले. सुपरस्टार असूनही गोविंदा आमच्यासाठी वेळ काढायचा. ते पाच शिफ्टमध्ये काम करायचे आणि तरीही घरातल्या सगळ्यांच्या अडचणी सांभाळायचे. आज मला या गोष्टींची जाणीव होतेय," असे कृष्णा म्हणाला.

आज कृष्णा आणि गोविंदा यांच्यात सर्व काही आलबेल नाही
कृष्णा आणि गोविंदा यांच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून वितुष्ठ निर्माण झाले आहेय़ झाले असे की, कृष्णाने एका शोमध्ये आपला मामा खलनायक असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे गोविंदा चांगलेच संतापले होते. ते म्हणाले की, कोणत्याही लेखकाने असे लिहिले असेल असे मला वाटत नाही. गोविंदा म्हणाले, "माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडतंय हे मी मान्य केलं आहे." तसेच गोविंदाने सांगितले होते की, त्यांच्या पत्नीने त्यांना कृष्णाच्या कामात हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे. ती स्वतः कृष्णाशी बोलतही नाही.

कृष्णाने मागितली होती माफी
कृष्णाने गोविंदासोबतचे मतभेद दूर करण्यासाठी मनीष पॉलच्या पॉडकास्टवर त्यांची माफीदेखील माफी मागितली होती. याशिवाय त्याने मामी सुनीता यांचीही माफी मागितील होती. एका मुलाखतीत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. तो म्हणाला होता, 'मला माहित आहे की मामी माझ्याबद्दल खूप काही बोलल्या आहेत. अर्थात मला वाईट वाटले आहे. पण मला वाटते की मामी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यामुळेच माझ्यावर रागावल्या आहेत. आता त्यांना माझा चेहरादेखील बघायचा नाहीये, यावरुन त्या किती रागावल्या आहेत, हे दिसतंय. तुम्ही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यावरच तुम्ही जास्त रागावता. आईवडील आपल्या मुलांवर चिडतात संतापतात तेव्हा ते असेच बोलतात,' असे तो म्हणाला.

कश्मिरा शाहच्या ट्विटवरून सुरु झाला होता वाद
कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये यांच्यातील हा वाद त्यांच्या पत्नींमुळे सुरु झाला. कृष्णाची पत्नी कश्मिराने 2018 मध्ये केलेले एक ट्विट सुनिता यांना खटकल्याने त्यांच्यात वाद झाले आणि या दोन्ही कुटुंबीयांना एकमेकांशी संबंध तोडले. कश्मिराने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘काही लोक पैशांसाठी नाचत होते.’ सुनीता यांना वाटले की हे ट्विट पती गोविंदासाठी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. सुनीता सांगतात की, गेल्या तीन वर्षात वाद इतका वाढला आहे की आता त्याला विसरण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच येत नाही.

बातम्या आणखी आहेत...