आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णा-गोविंदाच्या नात्यात दुरावा:कृष्णा अभिषेक म्हणाला, 'मला मामा-मामीची माफी मागायची आहे, मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो, ते माझ्या आईवडिलांसारखे आहेत'

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृष्णाने माफी मागितली

बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु आहे. कृष्णा आणि त्याच्या मामा-मामी यांच्यातील वाद तीन वर्षे जुना आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबाने हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला होता. यावर सुनीता संतापल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की, मला पुन्हा त्याचा चेहरा पाहायचा नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील जेव्हा गोविंदा यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये देखील कृष्णा दिसला नव्हता.

कृष्णाने माफी मागितली

मामी सुनीताच्या या बोलण्याने कृष्णा खूप दुखावला गेला आहे. एका मुलाखतीत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तो म्हणाला, 'मला माहित आहे की मामी माझ्याबद्दल खूप काही बोलल्या आहेत. अर्थात मला वाईट वाटले आहे. पण मला वाटते की मामी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यामुळेच माझ्यावर रागावल्या आहेत. आता त्यांना माझा चेहरादेखील बघायचा नाहीये, यावरुन त्या किती रागावल्या आहेत, हे दिसतंय. तुम्ही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यावरच तुम्ही जास्त रागावता. आईवडील आपल्या मुलांवर चिडतात संतापतात तेव्हा ते असेच बोलतात,' असे तो म्हणाला.

पुढे कृष्णा म्हणाला, 'मी सांगू इच्छितो की माझे माझ्या मामा मामीवर खूप प्रेम आहे. मी त्यांची माफी मागू इच्छितो. मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी माफी स्वीकारली नाही. ते मला का माफ करु इच्छित नाहीत, हे मला कळत नाहीये. मी त्यांच्या मुलासारखा आहे. आमच्यात जे काही मतभेद आहेत, ते मी दूर करु इच्छितो. आणि मी हे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण तरीदेखील भांडण सुरुच आहे. ख-या आयुष्यात मामा मामी मला माझ्या आईवडिलांच्या स्थानी आहेत.'

कश्मिरा शाहच्या ट्विटवरून सुरु झाला होता वाद
कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये यांच्यातील हा वाद त्यांच्या पत्नींमुळे सुरु झाला. कृष्णाची पत्नी कश्मिराने 2018 मध्ये केलेले एक ट्विट सुनिता यांना खटकल्याने त्यांच्यात वाद झाले आणि या दोन्ही कुटुंबीयांना एकमेकांशी संबंध तोडले. कश्मिराने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘काही लोक पैशांसाठी नाचत होते.’ सुनीता यांना वाटले की हे ट्विट पती गोविंदासाठी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. सुनीता सांगतात की, गेल्या तीन वर्षात वाद इतका वाढला आहे की आता त्याला विसरण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच येत नाही.

बातम्या आणखी आहेत...