आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Krushna Abhishek Wife Kashmira Shah Retaliated On Govinda's Wife's 'bad Daughter In Law' Comment, Called Sunita Ahuja A 'cruel Mother In Law'

कृष्णा अभिषेक-गोविंदा यांच्यातील वाद विकोपाला:गोविंदाच्या पत्नीने 'वाईट सून' म्हटल्यावर कश्मिरा शाहने केला पलटवार, सुनीता आहुजाला म्हटले 'निर्दयी सासू'

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कश्मिराने सुनीता आहुजाला निर्दयी सासू असे म्हटले आहे.

अभिनेता गोविंदा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आणि कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मिरा शाह यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. एका मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी कश्मिराचा उल्लेख वाईट सून असा केला होता. त्यावर पलटवार करत कश्मिराने सुनीता आहुजाला निर्दयी सासू असे म्हटले आहे.

कश्मिराने लिहिले, 'मी एका कामासाठी बाहेरगावी गेले होते. परत आले तर सगळीकडे वाचतेय की काही लोक कुटुंबाच्या भांडणात स्वतःचा फायदा करून घेत आहेत. एक वाक्य वाचताना माझ्या मुलाने विचारले आई वाईट सून काय असते? त्यावर मी म्हटले, जिची सासू खाष्ट आणि निर्दयी असते ती सून वाईट असते.#checkmate'

सुनीता आहुजा यांनी काय म्हटले होते?
एका मुलाखतीत सुनीता यांनी कश्मिरावर निशाणा साधत म्हटले होते, 'घरात भांडणं तेव्हा सुरू होतात जेव्हा तुम्ही घरात वाईट सून घेऊन येता.' यावरुन कश्मिराने सुनीता यांना सुनावले आहे.

पुन्हा वाद का झाला होता?
कृष्णा आणि त्याच्या मामा-मामी यांच्यातील वाद तीन वर्षे जुना आहे. काही दिवसांपूर्वीच ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबाने हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला होता. यावर सुनीता संतापल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की, मला पुन्हा त्याचा चेहरा पाहायचा नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील जेव्हा गोविंदा यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडमध्ये देखील कृष्णा दिसला नव्हता.

कृष्णाने मागितली होती माफी
मामी सुनीताच्या या बोलण्याने कृष्णा खूप दुखावला गेला होता. एका मुलाखतीत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. तो म्हणाला होता, 'मला माहित आहे की मामी माझ्याबद्दल खूप काही बोलल्या आहेत. अर्थात मला वाईट वाटले आहे. पण मला वाटते की मामी माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यामुळेच माझ्यावर रागावल्या आहेत. आता त्यांना माझा चेहरादेखील बघायचा नाहीये, यावरुन त्या किती रागावल्या आहेत, हे दिसतंय. तुम्ही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यावरच तुम्ही जास्त रागावता. आईवडील आपल्या मुलांवर चिडतात संतापतात तेव्हा ते असेच बोलतात,' असे तो म्हणाला.

पुढे कृष्णा म्हणाला, 'मी सांगू इच्छितो की माझे माझ्या मामा मामीवर खूप प्रेम आहे. मी त्यांची माफी मागू इच्छितो. मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांनी माझी माफी स्वीकारली नाही. ते मला का माफ करु इच्छित नाहीत, हे मला कळत नाहीये. मी त्यांच्या मुलासारखा आहे. आमच्यात जे काही मतभेद आहेत, ते मी दूर करु इच्छितो. आणि मी हे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पण तरीदेखील भांडण सुरुच आहे. ख-या आयुष्यात मामा मामी मला माझ्या आईवडिलांच्या स्थानी आहेत.'

कश्मिरा शाहच्या ट्विटवरून सुरु झाला होता वाद
कृष्णा अभिषेक आणि गोविंदामध्ये यांच्यातील हा वाद त्यांच्या पत्नींमुळे सुरु झाला. कृष्णाची पत्नी कश्मिराने 2018 मध्ये केलेले एक ट्विट सुनिता यांना खटकल्याने त्यांच्यात वाद झाले आणि या दोन्ही कुटुंबीयांना एकमेकांशी संबंध तोडले. कश्मिराने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘काही लोक पैशांसाठी नाचत होते.’ सुनीता यांना वाटले की हे ट्विट पती गोविंदासाठी आहे. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढला. सुनीता सांगतात की, गेल्या तीन वर्षात वाद इतका वाढला आहे की आता त्याला विसरण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच येत नाही.

बातम्या आणखी आहेत...