आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियाप्रमाणेच क्षितीजचा बचाव:अ‍ॅड. सतीश मानशिंदेंचा एनसीबीवर आरोप, म्हणाले- क्षितीजच्या घरात फक्त कोरड्या सिगारेटचे थोटके मिळाली, सेलिब्रिटींची नावे घेण्यासाठी एनसीबीकडून होतोय छळ

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीच्या कोठडीच क्षितीजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अ‍ॅड. सतीश मानशिंदे यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर आरोप केले आहेत. यावेळी सतीश म्हणाले की, त्यांचे क्लायंट क्षितीज प्रसादच्या घरात एनसीबीला फक्त कोरड्या सिगारेटचे थोटके मिळाली होती, एनसीबीने जबरदस्तीने त्याला गांजचे नाव दिले. ईशा आणि अनुभवला क्षितीजविरोधात जबाब द्यायला लावला असल्याचा दावा वकील सतिश मानेशिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर करण जोहर, सोमन मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज, राहिल यांची नावे घेण्यासाठी त्याच्यावर एनसीबीकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एनसीबीच्या कोठडीच क्षितीजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • काय म्हणाले सतीश मानशिंदे

पहिल्या दिवशी एनसीबी कोठडीत क्षितीजला चांगली वागणूक दिली गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी क्षितीजचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली तेव्हा, समीर वानखेडेंसह इतर अधिकारी तिथे उपस्थित होते. क्षितीज प्रसाद धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्याने त्याने करण जोहर, सोमल मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज यांनीही ड्रग्ज घेतले असे कबूल करावे, तर त्याला सोडून देण्यात येईल, असे क्षितीजला सांगण्यात आले. त्याने या गोष्टीस नकार दिल्यावर त्याच्याकडून जबरदस्तीने वदवून घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे सतिश मानेशिंदे यांनी म्हटले आहे.

  • एनसीबीने हे आरोप फेटाळून लावले

याआधीही सतीश मानशिंदे यांनी रियाच्या प्रकरणात एनसीबी अधिका-यांवर आरोप केला होता की, रियाने चौकशीदरम्यान कुठल्याही ए लिस्टरचे नाव घेतलेले नाही. एनसीबीचे दावे खोटे आहेत. एनसीबीला याबाबत विचारणा केली असता, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि म्हणाले, "प्रत्येक गुन्हेगार असेच म्हणतो, सतीश मानशिंदे यांना शुभेच्छा".

  • क्षितीजला 3 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

रकुल प्रीत सिंह हिनेदेखील चौकशी दरम्यान क्षितीज प्रसादचे नाव घेतले होते. एनसीबीने 24 तासांच्या चौकशीनंतर क्षितीजला अटक केली होती. रविवारी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या सुनावणी दरम्यान त्याच्या कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. क्षितीज 3 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात राहील. त्याच्यावर ड्रग्ज बाळगणे आणि पुरविल्याचा आरोप आहे. क्षितीजच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही ड्रग पॅडलर्सशी त्याचा काही संबंध नाही आणि त्याला या प्रकरणात अडकवले जात आहे.

  • क्षितीजच्या ड्रग्ज चॅटमध्ये समोर आली अनेक नावे

क्षितीज प्रसादची ड्रग्ज चॅट एनसीबीच्या हाती लागली असून, यातून अंकुश अर्नेजा, अनुज केसवानी, करमजीत यांची नावे समोर आली आहेत. या संभाषणात त्यांनी हॅश आणि एमडीएमए या ड्रग्जची मागणी केली होती. या प्रकरणी अंकुश अर्नेजालाही एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने कधी कधी गांजा सेवन करत असल्याची कबुली दिली आहे. मात्र, या व्यतिरिक्त कुठलेही ड्रग्ज घेतले नसल्याचे त्याने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...