आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज प्रकरण:अभिनेत्री कुब्रा सैत आणि चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनी आर्यनच्या अटकेवर दिली प्रतिक्रिया, म्हणाले - त्याची अटक संशयास्पद आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणालाही सत्य जाणून घ्यायचे नाही - कुब्रा सैत

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 2 ऑक्टोबरपासून कोठडीत आहे. 20 ऑक्टोबर रोजी त्याच्या जामिन याचिकेवर सुनावणी होणार आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकार आर्यनच्या समर्थनार्थ पुढे आले. आता अभिनेत्री कुब्रा सैत आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

कुब्रा म्हणाली की, हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे, संजय यांनी आर्यनची अटक संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

कोणालाही सत्य जाणून घ्यायचे नाही
एका मुलाखतीत कुब्रा म्हणाली, तुमची प्रत्येक गोष्ट जेव्हा कुणीतरी जज करत असतं तेव्हा आयुष्य जगण्याची ती सर्वात कठीण आणि भयंकर वेळ असते. प्रत्येकजण जराही विचार न करता तसचं सत्याची पडताळणी न करता आपला निर्णय सांगत असतो.

मी बातम्या पाहणे बंद केले
पुढे बोलताना ती म्हणाली, त्याचेही कुटुंबं आहे आणि त्यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे, स्वतःचे जीवन आहे. आपल्याकडे असलेल्या माध्यमांचा वापर जबाबदारीने करा. फालतू आणि मूर्खपणा करू नका हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे. यावेळी जुने दिवस बरे होते जेव्हा फक्त रात्री नऊ वाजता टीव्ही सुरु केल्यानंतर बातम्या लागायच्या ज्यात फक्त बातम्या असायच्या कुणाची मतं नव्हे, असे ती म्हणाली.

आर्यनची अटक संशयास्पद आहे
संजय गुप्ता यांनीही आर्यन खानच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, "संशयास्पद अटक, त्याच्या जवळ ड्रग्ज मिळाले नाही, त्याच्या रक्तातदेखील अमली पदार्थ आढळले नाही. तरीही तो 18 दिवस तुरुंगात घालवतो. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना स्वतःची मुले नाहीत का? तुम्ही दुसऱ्याच्या मुलाशी असे कसे वागू शकता?," असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...