आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
करण जोहरच्या गाजलेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा परजान दस्तूर अलीकडेच लग्नबंधनात अडकला आहे. परजानने पारंपरिक पारसी रितीरिवाजासह गर्लफ्रेंड डेलनासोबत लग्न केले आहे. त्याने सोशल मीडिया स्टोरीवर एक फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
फोटोत परजान ट्रेडिशन व्हाइट ड्रेसमध्ये दिसतोय. तर डेलनाने मरुन कलरची साडी परिधान केली आहे. परजानने हा फोटो स्वतःला आणि डेलनाला टॅग करुन, 'स्टार इज शायनिंग', असे कॅप्शन त्याला दिले आहे.
चार महिन्यांपूर्वी केली होती लग्नाची घोषणा
जवळजवळ चार महिन्यांपूर्वी परजानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन जानेवारी महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले होते. परजानने डेलनासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन लिहिले - ''एक वर्षापूर्वी असाच सुंदर दिवस होता, जेव्हा ती हो म्हणाली होती. आता फक्त 4 महिने बाकी आहेत.''
या चित्रपटांमध्ये झळकला आहे परजान
परजानने 'कुछ कुछ होता है'नंतर 'मोहब्बतें, 'कहो ना प्यार है', 'हाथ का अंडा', 'ब्रेक के बाद', 'कहता है दिल बार बार', 'हम तुम परजानिया', 'पॉकेट मम्मी', 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तो 2009 मध्ये पियुष झांच्या 'सिकंदर'मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. आता परजानचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. परजान दस्तूरने ‘हम तूम’ या चित्रपटाला आपला आवाज दिला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.