आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात प्रसिद्ध गायक:कुमार सानू यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन; अमेरिकेला रवाना होणार होते

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुमार सानू गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात जाणार होते.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी कुमार सानू यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ‘दुर्दैवाने सानूदा यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट फेसबुकवर त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आली आहे.

कुमार सानू गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात जाणार होते. पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने एक वृत्त वाहिनीला दिली आहे.

पत्नी आणि मुलींसोबत साजरा करणार होते वाढदिवस

कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली शनॉन आणि अॅनाबेल हे अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहरात वास्तव्याला आहेत. येत्या 20 ऑक्टोबर रोजी कुमार सानू यांचा वाढदिवस असून हा दिवस कुटुंबीयांसोबत घालवण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते अमेरिकेला जाणार होते. मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आता जाणे शक्य नाही.

प्रत्येक महिन्यात भेटायला जातात
कुमार सानू जवळपास प्रत्येक महिन्याला आपल्या पत्नी आणि मुलींना भेटायला जात होते. पण जानेवारीनंतर कोरोनाचा धोका वाढल्याने त्यांना अमेरिकते जायला मिळाले नाही. त्यानंतर ते या महिन्यात जाणार होते. मात्र आता त्यांचे जाणे रद्द झाले होते.

बातम्या आणखी आहेत...