आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोमो रिलीज:कुणाल खेमू स्टारर 'अभय 2'चा प्रोमो रिलीज, जबरदस्त सस्पेन्सचा तडका असलेली वेब सीरिज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा 'अभय 2' चा अनाउंसमेंट प्रोमो आहे.

मुंबई 'अभय'च्या पहिल्या यशस्वी सीझननंतर कुणाल खेमू लवकरच 'अभय 2'मध्ये अधिकारी अभय प्रभात सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. झी 5 प्रीमियमच्या या वेब सीरिजचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यात प्रचंड सस्पेन्स बघायला मिळत आहे. केन घोष दिग्दर्शित ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2019 मध्ये पहिला सीझन प्रदर्शित झाला.

कुणाल खेमूने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवरून 'अभय 2' चा प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमो शेअर करताना कुणाल लिहितो, 'हा अभय 2 चा अनाउंसमेंट प्रोमो आहे. यावेळी खेळ वेगळा आहे. जर हा सैतान आपली विचारसरणी अंमलात आणण्यासाठी काहीही करु शकतो तर आपण मनुष्यही या खेळात त्याला मात देऊ शकतो. अभय 2, झी 5 प्रीमियम'.

प्रोमोमध्ये कुणाल आधीच्या सीझनप्रमाणे अधिकारी अभय प्रताप सिंगची भूमिका साकारत आहे, जो गुन्हेगारी मानसिकतेला चांगल्या प्रकारे समजतो. हा सीझन बर्‍याच सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनसह बनलेला आहे. केन घोष दिग्दर्शित 'अभय 2' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 प्रीमियरवर रिलीज होईल. 2019 मध्ये त्याचा पहिला सीझन आला होता. ज्यात संदीप धर, एलनाझ नरोजी आणि कुणाल खेमू मुख्य भूमिकेत होते.

बातम्या आणखी आहेत...