आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुत्ते'चा दमदार ट्रेलर रिलीज:ट्रेलर शेअर करत अर्जुन कपूर म्हणाला, 'हटो कमिनो! कुत्ते आ गये!!'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह स्टारर बहुचर्चित 'कुत्ते' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या हटके शीर्षकामुळे त्याबद्दलची उत्कंठा वाढली होती. डार्क ह्युमरने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये सात ग्रे-शेडेड पात्र दिसत आहेत.

'एक हड्डी और सात तुकडे' अशी 'कुत्ते' या चित्रपटाची टॅगलाईन आहे. हा चित्रपट सात लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. सात जण एका गोष्टीची प्रतीक्षा करत आहेत. आता ती गोष्ट नक्की काय आहे हे प्रेक्षकांना चित्रपटातच कळेल.

पाहा व्हिडिओ...

चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत अर्जुन कपूरने कॅप्शन लिहिले, 'हटो कमिनो! कुत्ते आ गये!!'

13 जानेवारीला प्रदर्शित होणार चित्रपट

'कुत्ते' या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज, लव रंजन, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा सिनेमा गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच या चित्रपटाला विशाल भारद्वाजने संगीत दिले असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...