आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपडेट:आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार कोरोना व्हायरसचे संकट, लॉकडाऊननंतर नव्या पटकथेसह सुरु होणार चित्रीकरण

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटात कोरोना व्हायरसच्या संकटाचा समावेश केला नाही, तर ही कथा अपूर्ण ठरेल असे निर्मात्यांना वाटते.

आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसवर रिलीज होणार होता. पण देशात कोरोनाव्हायरसचे सावट पसरल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आले. आता या चित्रपटाशी संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, निर्मात्यांनी कोरोना व्हायरस महामारीचा कथेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कथेत 1947 नंतरच्या घटना

या चित्रपटात 1947 च्या फाळणीनंतरच्या अनेक ऐतिहासिक घटनांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, यामध्ये कोरोना व्हायरसच्या संकटाचा समावेश केला नाही, तर ही कथा अपूर्ण ठरेल असे निर्मात्यांना वाटते.

बॉलिवूड हंगामाने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, "हा चित्रपट इतिहासाच्या अनेक महत्वाच्या घटनांवर आधारित आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचे संकट दर्शविल्याशिवाय ही कहाणी पूर्ण होऊ शकत नाही. लॉकडाऊन काढल्यानंतर नव्या पटकथेसह चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात होईल." लॉकडाऊन जाहिर झाले तेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये सुरु होते.

'फॉरेस्ट गंप' चा हिंदी रिमेक

हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. त्याचे दिग्दर्शन रॉबर्ट जमॅकिस यांनी केले होते, तर पटकथा विन्सटन ग्रूमने लिहिली होती.  ओरिजनल चित्रपटात मुख्य पात्र फॉरेस्टचा मेंदू कमी काम करतो. तरीदेखील तो यश मिळवतो आणि एक ऐतिहासिक पुरुष बनतो. पण त्याचे खरे प्रेम त्याला सोडून जाते. 

हॉलिवूड चित्रपटाने ऑस्करमध्ये एक डजनभर नॉमिनेशन मिळवले होते आणि ऑस्कर अवॉर्ड्स जिंकले होते. टॉम हँक्स याला यासाठी सलग दुसऱ्यांदा बेस्ट अॅक्टरचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. आमिरने यामध्ये टॉम हँक्सने साकारलेले पात्र साकारले आहे.

'फॉरेस्ट गम्प' मधील प्रसिद्ध डायलॉग

या चित्रपटाचा नायक फॉरेस्ट गंप म्हणतो, 'माझी आई नेहमी म्हणते, आयुष्य चॉकलेटच्या डब्ब्याप्रमाणे आहे.' हा संवाद आजही प्रसिद्ध असलेल्या डायलॉगपैकी आहे. हा चित्रपट 1994 मध्ये रिलीज झाला होता. आता चित्रपटातील अभिनेता टॉम हँक्स 63 वर्षांचे झाले आहेत.

अद्वैत चंदनचे दिग्दर्शन

या चित्रपटात आमिर अनेक रोलमध्ये दिसणार आहे. त्याचे चित्रपटातील लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. 'लाल सिंह चड्ढा'मध्ये आमिरसोबत करीना कपूर झळकणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा 'सीक्रेट सुपरस्टार' फेम दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हा चित्रपट आता ख्रिसमस ऐवजी पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

आमिरचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये आला होता 

आमिर खान शेवटचा यशराज फिल्म्सच्या 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां'मध्ये झळकला होता. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. चित्रपटात आमिरसह अमिताभ बच्चन, कतरिना कैफ और फातिमा सना शेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

बातम्या आणखी आहेत...