आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका:LAC च्या दिग्दर्शकाचा खुलासा - शूटिंग सेटवर विचित्र वागत होता राहुल रॉय, नीट बोलताही येत नव्हते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुलला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे.

90च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आशिकी या सुपरहिट चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. राहुल रॉय कारगिलमध्ये आगामी LAC या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. दरम्यान, त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 52 वर्षीय राहुल रॉयला सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या प्रकृतीविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कुमार गुप्ता यांनी मुंबई मिररसोबत बातचीत केली.

एलएसीच्या एका सीनमध्ये अभिनेता निशांत मलकानीसोबत राहुल रॉय
एलएसीच्या एका सीनमध्ये अभिनेता निशांत मलकानीसोबत राहुल रॉय

राहुलला नीट बोलता येत नव्हते
नितीन कुमार गुप्ता यांनी सांगितले की, गुरुवारी जेव्हा मी राहुलला त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये भेटायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की तो काहीसे विचित्र वागत आहे. त्याला नीट बोलताही येत नाहीये.

दिग्दर्शक पुढे म्हणाले, "मी डॉक्टर असल्याने सुरुवातीला मला वाटले की त्याला कदाचित अफासिया आहे ज्यामुळे त्याला बोलण्यात त्रास होतोय. हे पाहून मी त्याला स्थानिक रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी घेऊन गेलो. त्याची प्रकृती पाहून डॉक्टर काहीही बोलले नाहीत पण मी राहुलचे रिपोर्ट्स माझ्या डॉक्टर मित्रांना दाखवले. त्यांच्यातील एका मित्राने सांगितले की, ही मिनी स्ट्रोकची लक्षणे जी सीटी स्कॅनमध्ये सापडली नाहीत, म्हणूनच त्याला उपचारांसाठी मुंबई येथे आणणे आम्हाला योग्य वाटले."

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलची प्रकृती आता स्थिर आहे. नितीन म्हणाले की, राहुल अजूनही डॉक्टरांच्या ऑब्जरवेशनमध्ये असून बोलण्याच्या स्थितीत आहेत. राहुला चांगला मित्र असल्याने त्याची वैद्यकीय बिले भरत असल्याचेही नितीन यांनी उघड केले.

तीन दशकांपासून चित्रपटात सक्रिय
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser