आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेडी गागाला दिलासा:लेडी गागाची लाडकी कुत्री कोजी आणि गुस्तावचा शोध लागला, दोन दिवसांपूर्वी झाले होते अपहरण, माहिती देणारी महिला झाली कोट्यधीश

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लेडी गागाची ही दोन्ही कुत्री फ्रेचं बुलडॉग जातीची आहेत.

जगप्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाला दिलासा मिळाला आहे. तिची दोन्ही लाडकी कुत्री कोजी आणि गुस्ताव तिला परत मिळाली आहेत. दोन दिवसांपूर्वी लेडी गागाच्या कुत्र्यांची काळजी घेणारा रायन फिशर या तरुणावर अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांनी दोन्ही कुत्र्यांचे अपहरण केले होते. आता या चोरीला गेलेल्या कुत्र्यांचा तपास लागला आहे. कोजी आणि गुस्ताव यांचा शोध लागल्याचा आनंद लेडी गागाने व्यक्त केला आहे.

एका महिलेने लेडी गागाच्या दोन्ही कुत्र्यांना पोलिसांकडे सोपवले आहे. लेडी गागाच्या मॅनेजरने लगेचच पोलिस स्टेशन गाठत दोघांचाही ताबा घेतला. ही दोन्ही कुत्री या महिलेकडे कशी आली याचा तपास अद्याप लागला नाहीये. पण या कुत्र्यांचा शोध घेणारी ही महिला ता कोट्यधीश झाली आहे. या महिलेला लेडी गागाने तब्बल 50 लाख डॉलर्स म्हणजेच 3 करोड 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.

कोजी आणि गुस्ताव यांचे अपहरण झाल्यानंतर लेडी गागाने त्यांना शोधून देणा-याला तब्बल पन्नास लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. इतकेच नाही तर शोधून आणणा-याला कोणतीही प्रश्नोत्तरे केली जाणार नाहीत, हेदेखील तिच्यावतीने सांगण्यात आले होते. यासाठी दोन्ही कुत्र्यांच्या नावावरुन kojiandgustav@gmail.com हा ईमेल आयडीही जारी करण्यात आला होता.

लेडी गागाने सोशल मीडियावरुन दिली होती घटनेची माहिती
या घटनेमुळे लेडी गागा दुखावली गेली होती. तिने तिचे दु:ख सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केले होते. ‘मला माझ्या कुटुंबाला पुन्हा एकत्र पाहायचंय,’ असे तिने म्हटले होते. सोबतच तिच्या कुत्र्यांची काळजी घेणा-या रायन फिशर या तरुणाचे तिने आभार मानले होते. ‘आपल्या कुटुंबासाठी तू जीव धोक्यात घातलास, तू कायम हिरो राहशील’ असे म्हणत लेडी गागाने त्याचे आभार मानले होते.

या घटनेबद्दल पोलिसांनी सांगितले होते की, डॉग वॉकर (कुत्र्यांचा सांभाळ करणारा) ला सेलिब्रिटी कनेक्शनमुळे गोळी मारण्यात आली की, यामागे दुसरे कोणते कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लेडी गागाची ही दोन्ही कुत्री फ्रेचं बुलडॉग जातीची आहेत. त्यांची किंमत लाखोंच्या घरात असते.

बातम्या आणखी आहेत...