आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑस्कर विजेती पॉप सिंगर लेडी गागा आपल्या पाळीव कुत्र्यावर इतकं प्रेम करते की त्यांना शोधण्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे. बुधवारी तिच्या डॉग वॉकर (कुत्रा फिरवणारा) ची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि दोन फ्रेंच बुलडॉग्स हॉलिवूडमधून चोरी करण्यात आले. त्यांना शोधून देणा-याला लेजी गागाने तब्बल पाच लाख डॉलर (जवळजवल 3.65 कोटी रुपये) चे बक्षीस जाहीर केले आहे.
गागाचे वडील म्हणाले- हे खरोखर भयावह आहे
गागाचे वडील जो जर्मनोटा यांनी गुरुवारी न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना सांगितले की, हा हल्ल्या झाल्यापासून ते आपल्या मुलीच्या संपर्कात आहेत. ते म्हणतात, "आम्ही या घटनेमुळे फारच अस्वस्थ आहोत. हे खरोखर खूप भयावह आहे. हे एखाद्याने आपल्या मुलांना पळवून नेल्यासारखे आहे."
वॉकर हल्ल्यातून सुदैवाने बचावला - पोलिस
लॉस एंजिलिसचे पोलिस कॅप्टन जोनाथन टिपेटच्या यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी डॉग वॉकरला गोळी मारण्यात आली होती. मात्र सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला आहे. हा डॉग वॉकर लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन गेला होता. यापैकी दोन चोरीला गेले, तर एकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. नंतर त्याला शोधण्यात यश आले.
कुत्रा शोधून आणणा-याला प्रश्नोत्तरे केली जाणार नाहीत
पोलिसांनी सांगितल्यानुसार, डॉग वॉकरला सेलिब्रिटी कनेक्शनमुळे गोळी मारण्यात आली की, यामागे दुसरे कोणते कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन कुत्रे कोजी आणि गुस्ताव यांना शोधण्यासाठी लेडी गागाने मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर शोधून आणणा-याला कोणतीही प्रश्नोत्तरे केली जाणार नाहीत, हेदेखील सांगण्यात आले आहे. यासाठी दोन कुत्र्यांच्या नावावरुन kojiandgustav@gmail.com हा ईमेल आयडीही जारी करण्यात आला आहे.लेडी गागा सध्या रोममध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.