आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लगान'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आईचे निधन:मुंबईच्या लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लगान' आणि 'जोधा अकबर' या चित्रपटांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई किशोरी गोवारिकर यांचे निधन झाले आहे. 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतील दादर शिवाजी पार्क स्मशानभूमीत किशोरी गोवारीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमिर खानसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आशुतोष गोवारीकर यांचे सांत्वन केले. आशुतोष संपूर्ण कुटुंब मुळेच कोल्हापूरचे आहे.

आशुतोषने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती

आशुतोष गोवारीकर यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1965 रोजी नवी दिल्ली येथे झाला. आशुतोष गोवारीकर हे बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आशुतोष यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून केतन मेहता यांच्या 'होली' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्येही काम केले.

'लगान' आणि 'जोधा अकबर'ने वेगळी ओळख मिळवून दिली
1993 मध्ये आशुतोष यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. 'बाजी' हा त्यांचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट होता. त्यांच्या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसला होता. 2001 मध्ये, त्यांनी 'लगान' हा चित्रपट दिग्दर्शित केला, या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. या चित्रपटातही आमिर खान मुख्य भूमिकेत होता. 'लगान' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपटांपैकी एक मानला जातो. 2008 मध्ये त्यांनी 'जोधा अकबर' दिग्दर्शित केला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...