आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लालसिंह चड्ढा' शूटिंग अपडेट:पुढच्या महिन्यात 100 पेक्षा जास्त कलाकारांसोबत कारगिलमध्ये युद्धाचे शूटिंग करणार आमिर खान

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंग नव्हे तर फक्त लोकेशनचा शोध घेताहेत निर्माते

गेल्या दोन दिवसांपासून आमिर खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तो कारगिलच्या डोंगरावर फिरत असल्याचे दिसत आहे. हा फोटो समोर येताच आमिर कारगिलमध्ये ‘लालसिंह चड्ढा’चे शूटिंग करत असल्याचे बोलले जात होते. दिव्य मराठीने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा दुसरेच सत्य समोर आले. तेथील पर्यटक विभागाच्या अधिकारी आणि शूटिंग संचालकांनी सांगितले, निर्माते आणि त्यांची टीम सध्या लोकेशनचा शोध घेत आहेत. शूटिंग तर पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे.​​​​​​

अधिकाऱ्यांनुसार, आमिर आणि त्यांची टीम 29 एप्रिल रोजी कारगिलला आले होते. येथे त्यांनी चित्रपटासाठी लोकेशनसाठी रेकी करणे सुरू केले. आणखी एक आठवडा हेच काम केले जाईल. ही रेकी कारगिल आणि काश्मिरमध्ये केली जात आहे. पुढच्या महिन्यापासून याची शूटिंग सुरू केली जाईल. मात्र अजून तारखा फायनल झाल्या नाहीत.

सहज मिळू शकते शूटिंगसाठी परवानगी
कारगिलमध्ये टीम युद्धाचे दृश्य शूट करणार आहे. खरंतर, काश्मिर आणि मनालीसारख्या डोंगराळ भागात कोविडचे प्रकरण कमी आहेत. त्यामुळे तेथे सेटवर 100 ते 200 लोकांसोबत शूट करण्याची परवानगी सहज मिळू शकते. त्यामुळे निर्मातेदेखील इतक्या मोठ्या लोकांसोबत युद्धाचे दृश्य शूट करणार आहेत

‘धूम 3’पासूनच अधिकार घेण्याचा प्रयत्न करत होता आमिर

सूत्रांनी सांगितले, आमिरला वैयक्तिकरीत्या हा चित्रपट आवडला आहे. तो ‘धूम 3’पासूनच ‘लालसिंह चड्ढा’चे अधिकार घेण्यासाठी ‘फॉरेस्ट गम्प’ च्या निर्मात्यांच्या मागे लागला होता. सध्या कारगिलमध्ये आमिरला मिळून 20 लाेकांची टीम आली आहे. येथून सर्वच काश्मीरला रवाना होतील.

आमिरसोबत काम करण्याच्या तयारीत आहेत संजय लीला भन्साळी
‘लाल सिंह चड्ढा’नंतर आमिर कोणता चित्रपट करणार याची चर्चाही इंडस्ट्रीत सुरू झाली आहे. भन्साळी त्यांना आपल्या एका चित्रपट घेऊ इच्छित असल्याची चर्चा आहे. तो एका पुस्तकावर आधारित असेल. त्यात ओडिशाचे चित्रकार पीके महानंदिया यांची कथा दाखवली जाईल. पेंटर पीकेने स्वीडनमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेयसीसाठी भारत ते स्वीडनपर्यंतचा प्रवास सायकलवरून केला होता. 22 जानेवारी 1977 मध्ये त्यांनी भारतातून हा प्रवास सुरू केला होता. त्याच वर्षी ते 28 मे रोजी इस्तंबुलवरुन युरोपला गेले होते. भन्साळी याला स्वीडनच्या जागी फ्रान्समध्ये सेट करु इच्छित आहेत. मात्र या चित्रपटासाठीची आमिर आणि भन्साळी यांची बैठक अजून झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...