आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी-सुष्मिता सेन विभक्त झाल्याची शक्यता:IPL च्या माजी अध्यक्षांनी सोशल मीडियावरून सुष्मिताचे नाव हटवले; डिस्प्ले पिक्चरही बदलला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे नाते अधिकृत केले होते, मात्र आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. झाले असे की, ललित मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलच्या बायोमधून सुष्मिताचे नाव काढून टाकले आहे. यासोबतच त्यांनी त्यांचा डिस्प्ले फोटोदेखील बदलला आहे.

त्यांच्या बायोमध्ये फक्त IPL फाउंडर आणि मून असे लिहिले आहे. हे पाहून युजर्स दोघांचे नाते संपुष्टात आल्याची शक्यता वर्तवत आहेत. मात्र, सुष्मिता आणि ललित यांनी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

इंस्टाग्रामवर टाकला होता सुष्मितासोबतचा प्रोफाईल फोटो
ललित यांनी गेल्या महिन्यात त्यांचा प्रोफाइल फोटो बदलला होता. या फोटोत त्यांच्यासोबत सुष्मिता सेन दिसत होती. फोटो शेअर करत ललित यांनी इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिले होते, 'शेवटी एक नवीन आयुष्य सुरू करत आहे, पार्टनर इन क्राइम माझे प्रेम सुष्मिता सेनसोबत.' मोदींनी सुष्मिताच्या इन्स्टा अकाउंटलाही टॅग केले होते.

ललित मोदींनी त्यांचे रिलेशनशिप जाहीर केले होते.
ललित मोदींनी त्यांचे रिलेशनशिप जाहीर केले होते.

ललित-सुष्मिताच्या ब्रेकअपमागील कारण रोहमन शॉल आहे का?
ललित आणि सुष्मिताच्या ब्रेकअपचे सर्वात मोठे कारण तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचे सांगितले जात आहे. ब्रेकअपनंतरही दोघे अनेकदा पार्टी करताना दिसतात. अलीकडेच, रोहमन सुष्मिताच्या मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये स्पॉट झाला होता. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी सुष्मिताच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतही तो दिसला होता.

अडीच वर्षांच्या अफेअरनंतर रोहमन-सुष्मिताचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रेकअप झाले होते. त्यावेळी दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. रोहमन सुष्मितापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे.

सुष्मिताचे होते 11 पेक्षा जास्त अफेअर
सुष्मिता सेनचे नाव आतापर्यंत अनेक लोकांशी जोडले गेले आहे. तिचे 11 पेक्षा जास्त लोकांशी अफेअर होते. रोहमन व्यतिरिक्त तिचे नाव विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, वसीम अक्रम, संजय नारंग, बंटी सजदेह यांसारख्या अनेक लोकांशी जोडले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...