आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक चित्रपटांचा विक्रम:700 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकल्या ललिता पवार, अमरीश पुरींनी 38 वर्षांत केले 450 चित्रपट

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया या कलाकारांबद्दल -

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बनतात. काही फ्लॉप तर काही मोठ्या पडद्यावर कमाल दाखवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, ज्या कलाकार तुम्ही पडद्यावर पाहत आहात, त्या कलाकारांनी किती चित्रपटांमध्ये काम केले असेल. नाही ना? जगात सर्वाधिक चित्रपट करण्याचा विक्रम दाक्षिणात्य अभिनेत्री मनोरमा यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चित्रपट करण्याचा विक्रमही एका महिलेच्या नावावर आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम केला आहे -

ललिता पवार

या यादीत पहिलं नाव आहे अभिनेत्री ललिता पवार यांचे. ललिता पवार यांना बॉलिवूडची फर्स्ट लेडी असेही म्हटले जाते. 1928 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या ललिता पवार यांनी 1998 पर्यंत सिनेमांमध्ये काम केले. 70 ते 80 च्या दशकात ललिता यांना खलनायिकेच्या भूमिकेत चांगलीच ओळख मिळाली. त्यांनी चतुर सुंदरी, श्री 420, दलेर, पृथ्वीराज चौहान यांसारख्या चित्रपटात काम केले. रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध शो रामायणमधील मंथरा या भूमिकेतून त्यांना विशेष ओळख मिळाली.

शक्ती कपूर

1974 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या शक्ती कपूर यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. शक्ती कपूर यांच्या नावावर 700 चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम आहे. 80 आणि 90 च्या दशकात ते त्याच्या विनोदी भूमिका आणि व्हिलनच्या भूमिकांसाठी ओळखला जात होते. या काळात शक्ती कपूर बहुतेक प्रत्येक चित्रपटांमध्ये दिसले.

अनुपम खेर​​​​​​​

अनुपम खेर यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुपम यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1984 मध्ये आलेल्या 'सारांश' या सिनेमातून झाली. या चित्रपटात 29 वर्षीय अनुपम यांनी 65 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अनुपम यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली, त्यानंतर अनुपम यांचा चित्रपट प्रवास आजतागायत सुरू आहे.

अरुणा इराणी

6 दशकांपासून बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अरुणा इराणी यांनी आतापर्यंत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरुणा इराणी यांनी 1961 मध्ये गंगा जमुना या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी बेटा, पेट प्यार आणि पाप सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले.

अमरीश पुरी

अमरीश पुरी यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आयकॉनिक व्हिलनची भूमिका साकारली आहे. त्यांनी 1967 ते 2005 पर्यंत 450 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बहुतेक चित्रपट हिट झाले आहेत. मिस्टर इंडिया असो किंवा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, अमरीश पुरी यांनी अभिनयाचा वेगळा दर्जा सेट केला. चित्रपटांमध्ये त्यांच्या आवाजाची जादू त्यांच्या व्यक्तिरेखेत जीव आणत असे.

ओम पुरी

लोक ओम पुरी यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि आवाजासाठी ओळखत असे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 350 चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूडमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...