आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनावर भडकली लालूंची मुलगी:रोहिणी यांनी कंगनाला म्हटले- 'आंख की अंधी और दिमाग से पैदल', कंगनाने गंगेतील मृतदेह नायजेरियाचे असल्याचे म्हटले होते

पटनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव यांच्या समर्थनार्थ त्या आवाज उठवत राहतात. रोहिणी यांनी यावेळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या विरोधात आपला मोर्चा उघडला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कंगनाविरोधात एक पोस्ट लिहिली आहे.

पोस्टमध्ये रोहिणी यांनी कंगनाला 'आंख की अंधी और दिमाग से पैदल' म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री राज्यसभेवर जाण्यासाठी सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोहिणी यांचे हे वक्तव्य कंगनाच्या त्या विधानाला उत्तर म्हणून आले आहे, ज्यात तिने गंगेतील मृतदेहांच्या व्हिडीओला भारत बाहेरील म्हटले होते.

कंगनाला तुरूंगात पाठवण्याची मागणी केली
आरजेडी सुप्रीमोच्या मुलीने सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'कंगना दिमाग से पूरी तरह पैदल हो गई है'. ती मानवतेचा गळा घोटत आहे. गंगेमध्ये तरंगत असलेल्या मृतदेहांना नायजेरियाचे सांगत आहे. असे करून कंगनाला 'फकीरा' ची प्रतिमा सेव्ह करायची आहे. ती बनावट झाशीची राणीही बनते आहे. कंगनाला तुरूंगात पाठवावे.

काय आहे प्रकरण
कंगनाने सोशल मीडियावर लिहिले होती की, गंगेमध्ये तरंगणारे मृतदेह भारताचे नाहीत. ते नायजेरियाचे आहेत. याआधीही लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी यांनी सोशल मीडियावर राजकीय विषयांवर लेखन केले आहे. वडिलांच्या सुटकेसाठीही त्यांनी मोहीम राबवली होती. रोहिणी भाऊ तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्या विरोधकांना लक्ष्य करत राहतात.

बातम्या आणखी आहेत...