आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध गायक लकी अली अडचणीत सापडले आहेत. बंगळूरमधील त्यांच्या जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीररित्या ताबा मिळवल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली आहे. याविषयी त्यांनी फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. लकी अली यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या ओपनम लेटरमध्ये काही लोकांच्या नावांचा उल्लेख केला आहे, ज्यात एका आयएएस अधिका-याच्या नावाचाही समावेश आहे. हे लँड माफिया त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देत असल्याचे लकी अली यांनी म्हटले आहे.
लकी अली यांनी फेसबुकवर काय लिहिले?
लकी अलीने फेसबुकवर सांगितले की, काही लोक जबरदस्तीने त्यांच्या शेतात घुसले. कर्नाटकच्या डीजीपींना त्यांनी पत्र लिहिले आहे. ते लिहितात, 'सर, माझे नाव मकसूद महमूद अली आहे. मी दिवंगत अभिनेते आणि कॉमेडियन मेहमूद अली यांचा मुलगा आहे आणि लकी अली या नावाने ओळखला जातो. मी सध्या कामासाठी दुबईत आहे त्यामुळे तुमच्या मदतीची गरज आहे.'
'केंचनहल्ली येलाहंका स्थित माझ्या फार्म हाऊसवर बेंगळुरूचे भूमाफिया, सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डी यांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. रोहिणी सिंधुरी या आयएएस अधिकारीच्या मदतीने त्यांनी हे कृत्य केले आहे. रोहिणी स्वतःच्या फायद्यासाठी राज्यातील सुविधांचा गैरवापर करत आहेत. ते लोक जबरदस्तीने माझ्या शेतात घुसले असून आवश्यक कागदपत्रे दाखवण्यास नकार देत आहेत,' असे लकी अली यांनी सांगितले आहे.
लकी अली यांनी पोलिसांना केले मदतीचे आवाहन
लकी अलींनी पुढे लिहिले, 'माझ्या वकिलाने मला याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आम्ही 50 वर्षांहून अधिक काळ इथे राहत असताना, त्यांच्याकडे फार्मवर येण्याचा कोणताही न्यायालयीन आदेश नाही. याबाबत आम्ही एसीपीकडे तक्रार केली. मला अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. माझे कुटुंब आणि लहान मुले फार्मवर एकटे आहेत. मला स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. उलट ते अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की 7 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीपूर्वी हे बेकायदेशीर कृत्य थांबवा. कृपया आम्हाला न्याय द्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी हे सर्व लोकांसमोर आणले,' असे लकी यांनी म्हटले आहे.
चाहत्यांनी दिला पाठिंबा
लकी अली यांची ही पोस्ट समोर येताच चाहते त्यांना पाटिंबा देत आहेत. पण अद्याप प्रशासनाकडून यावर प्रतिक्रिया आली ही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या लकी अली पार्श्वगायन करत नसले तरी त्यांचे लाईव्ह शोज सुरू असतात.
90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक होते लकी
लकी अली हे प्रसिद्ध गायक आहेत. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1958 रोजी झाला. प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन मेहमूद हे त्यांचे वडील होते. 'कहो ना प्यार हैं' या चित्रपटातील 'एक पल का जीना' या गाण्याचे ते प्रसिद्धीझोतात आले. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. 90 च्या दशकात त्यांच्या गाणी खूप गाजली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.