आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेलबॉटम'मध्ये इंदिरा गांधीच्या भूमिकेत लारा दत्ता:लारा दत्ताने स्क्रिप्ट न ऐकता इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यास दिला होता होकार, म्हणाली - ही भूमिका करण्यासाठी खूप रिसर्च करावे लागले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाराने स्क्रिप्ट न ऐकता चित्रपट केला होता साइन

या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'बेलबॉटम'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. 19 ऑगस्ट रोजी रिलीज होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार भारतीय रॉ एजंटच्या भूमिकेत असून त्याच्यासह वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून भारतीय विमानाच्या अपहरणाचा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधील अक्षयच्या अंदाजाने सगळ्यांना इम्प्रेस केले, पण लारा दत्ता ही देखील चित्रपटातील सरप्राइज पॅकेज आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लारा दत्ताने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. लारा दत्ताने ‘बेल बॉटम’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

लाराने स्क्रिप्ट न ऐकता चित्रपट केला होता साइन
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात लाराने तिला ही भूमिका कशी मिळाली हे सांगितले. लाराने सांगितल्यानुसार, तिला एक फोन आला आणि तिला सांगितले गेले की तिला इंदिरा गांधींची भूमिका साकारायची आहे. स्क्रिप्ट न ऐकताच भूमिकेसाठी होकार दिल्याचे ती यावेळी म्हणाली.

लारा पुढे म्हणाली, 'एका आयकॉनिक व्यक्तीला मोठ्या पडद्यावर साकारणे ही स्वतःच मोठी जबाबदारी होती. या चित्रपटात विमान अपहरणाची घटना चित्रीत करण्यात आली आहे. ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, पण ही भूमिका साकारतानाचा अनुभव खूप छान होता. यासाठी बराच होमवर्क आणि रिसर्च करावा लागला. परंतु ही संधी जीवन बदलणारी होती ज्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन.'

सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट
'बेल बॉटम' हा चित्रपट 1984 च्या विमान अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय विमानाचे अपहरण झाल्यानंतर प्रवाशांच्या सुखरुप सुटकेसाठी सरकारने एका खास व्यक्तीकडे हे ऑपरेशन सोपवले होते. या रॉ एजंटचे कोड नेम बेल बॉटम होते. या अपहरणात 210 प्रवाशांना बंदी बनवण्यात आले होते. चित्रपटात अक्षय कुमारने ही प्रमुख भूमिका वठवली असून वाणी कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे तर हुमा कुरैशी दुबईस्थित एका सपोर्ट ग्रुपचा भाग आहे, जो या ऑपरेशनमध्ये भारताला मदत करतो.

19 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी यांनी केले आहे, तर पूजा एंटरटेन्मेंटच्या बॅनरच्या या चित्रपटाची िनर्मिती वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनीश अडवाणी, निखिल अडवाणी आणि मधु भोजवानी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...