आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींसोबतचे लाराचे कनेक्शन:इंदिरा गांधीॆचे खासगी वैमानिक होते लारा दत्ताचे वडील, 'बेलबॉटम'मध्ये त्यांची भूमिका साकारण्यापूर्वीच कनेक्शन जाणवले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लारा लहानपणी इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या गोष्टी ऐकत मोठी झाली आहे.

अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'बेल बॉटम'ची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेषतः या चित्रपटातील अभिनेत्री लारा दत्ताची भूमिका सर्वाधिक चर्चेत आहे. लारा दत्ता या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील लाराचा लूक पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. पण लाराचा इंदिरा गांधींशी अप्रत्यक्ष संबंध होता, हे अनेकांना ठाऊक नाहीये. तिचे वडील विंग कमांडर एल. के. दत्ता हे इंदिरा गांधींचे खासगी वैमानिक होते. म्हणूनच लारा लहानपणी त्यांच्याविषयीच्या गोष्टी ऐकत मोठी झाली आहे.

मेकअपसाठी लागायचे 3 तास
लाराने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, मेकअप करण्यासाठी दररोज सकाळी तिला तीन तास लागायचे. आणि चित्रीकरण आटोपल्यानंतर तो काढण्यासाठी एक तास लागायचा. याविषयी लारा म्हणाली की, तिला इतक्या सकाळी उठण्यास कोणतीही अडचण नव्हती, कारण तिने यापूर्वी अक्षय कुमारसोबत 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. लाराने मेकअपचा एक टाइम-लॅप्स व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यात तिच्या लूक ट्रान्सफॉर्मेशनची झलक बघायला मिळते.

लारा या भूमिकेसाठी खूप खूश असून ही आयुष्यातली सर्वात चांगली संधी होती असे तिचे म्हणणे आहे. 'देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते तसेच मोठी जबाबदारी होती,' असे लारा म्हणाली आहे.

पती आणि मुलीची अशी होती प्रतिक्रिया
लारा दत्ताने सांगितले की, लॉकडाऊनमुळे तिचे कुटुंबीय लूक टेस्ट दरम्यान घरी उपस्थित होते. लाराने तिच्या मुलीच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले की, 'ती उत्सुक होती. ती आत आली आणि माझ्या चेहऱ्यावरचे सिलिकॉन पाहून म्हणाली, "आई ते तुला मारणार आहेत, तू यात श्वास घेऊ शकत नाहीस." तिला माझी खूप काळजी वाटत होती. महेश भूपतीच्या प्रतिक्रियेबद्दल लारा म्हणाली, "माझे पती हैराण झाले होते. ते कदाचित खूप अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले की मी तुम्हाला मिठी मारू शकत नाही कारण तू तुझ्यासारखी दिसत नाहीये."

रंजीत एम तिवारी दिग्दर्शित 'बेलबॉटम' हा चित्रपट 1984 च्या ऑपरेशन ब्लूस्टारवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, हुमा कुरैशी, वाणी कपूर यांच्याही भूमिका आहेत. बेलबॉटम 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...