आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरापूर्वी लता दीदींनी माहीला केले होते आवाहन:जेव्हा लता दीदी धोनीला म्हणाल्या होत्या - देशाला तुमच्या खेळाची आवश्यकता आहे, माझी विनंती आहे रिटायरमेंटचा विचारदेखील मनात आणू नका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी इंस्टाग्रामवर संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी भारतीय क्रिकेट संघातून संन्यास घेण्याची घोषणा केली.
  • 9 जुलै 2019 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या शेवटच्या सामन्यात धोनीने 50 धावा केल्या होत्या.

आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी मी निवृत्त झालोय असं समजावं… स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी इंस्टाग्राम अकाउंटवर धोनीने एक छोटोसा व्हिडिओ पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान धोनीच्या निवृत्तीवर गायिका लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेची सगळे वाट बघत आहेत. कारण वर्षभरापूर्वी लता दीदींनी धोनीला रिटायरमेंट घेऊ नका, असे आवाहन केले होते.

  • लता दीदी म्हणाल्या होत्या - कृपया असा विचार करू नका

11 जुलै 2019 रोजी या ट्विटमध्ये लता दीदींनी लिहिले होते - नमस्कार, एम एस धोनी. सध्या ऐकायला येत आहे की तुम्ही रिटायर होऊ इच्छित आहात. कृपया असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची आवश्यकता आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की, रिटायरमेंटचा विचार तुम्ही मनातून काढून टाका.

त्यावेळी लता दीदींची विनंती धोनीपर्यंत पोहोचली होती आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली नव्हती.

  • वर्षभरापासून चर्चा सुरू होत्या

गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कोणताही सामना झाला नाही. अशा परिस्थितीत त्याने निवृत्तीचा निर्णय घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. खरं पाहता 2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या आल्या होत्या. यावर लता दीदींनी प्रतिक्रिया दिली होती.

बॉलिवूडच्या इतर सेलेब्सच्या प्रतिक्रिया

बातम्या आणखी आहेत...