आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखात बुडाले बॉलिवूड:लता मंगेशकर यांच्या निधनाने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये दुःखाची लाट, अक्षय कुमार, अनिल कपूर, ए आर रहमान यांच्या सह या सेलेब्सने वाहिली श्रद्धांजली

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वरा कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनियाचा त्रास होता. त्यानंतर 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'भारतरत्न' लताजींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन, अनुपम खेर, हेमा मालिनी, धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

सेलेब्सने शेअर केली पोस्ट

अक्षय कुमार म्हणाला...
अक्षय कुमारने लिहिले, 'मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे... आणि असा अवाज कोणी कसे विसरु शकते. लता मंगेशकरजींच्या निधनाने मोठे दुःख झाले आहे, माझ्या संवेदना आणि प्रार्थना, ओम शांती.'

अनिल कपूर यांनी लिहिले...

'माझे मन मोडले. मात्र या अविश्वसनीय आत्माला जाणण्यासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी धन्य आहे... लताजींना आपल्या मनात एक असे स्थान आहे, जे कधीत कोणाकडून हिसकावले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी आपल्या संगीताने आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे. त्यांनी शांतीने आराम करावा आणि आपल्या चमकने आकाशाला उजळवून टाकावे.'

मधुर भांडारकर यांनी वाहिली श्रद्धांजली

मधुर भांडारकर यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, 'दीदींच्या निधनाने खूप दुःख झाले. त्या माझ्यासाठी अनेक वर्षांपासून आईसारख्या आहेत. दर आठवड्याला फोन करून त्यांच्याशी बोलायचो. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांची उपस्थिती माझ्या आयुष्यात खूप लक्षात राहील. लव्ह यू दीदी. ओम शांती. # व्हॉइस ऑफ इंडिया."

ए.आर. रहेमान यांनी व्यक्त केले दु-ख

प्रेम, सन्मान आणि प्रार्थना असे ए.आर. रहेमान यांनी लिहिले आहे.

गीतकार स्वानंद किरकिरे यांनी व्यक्त केला शोक

फिल्म ट्रेड अॅनालिस्टने वाहिली श्रद्धांजली

--

बातम्या आणखी आहेत...