आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला पुनर्जन्म मिळू नये:लतादीदी स्वतः म्हणाल्या होत्या - 'माझ्या आयुष्यातील अडचणी फक्त मलाच माहित आहेत'

अरुणिमा शुक्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका मुलाखतीत लताजींना विचारण्यात आले होते, "पुन्हा जन्म मिळाला तर लता मंगेशकर म्हणून आवडले का?"

यावर लतादीदी म्हणाल्या होत्या, "मला आधी पण असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी जे उत्तर दिले होते तेच देईन, मला पुनर्जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचे नाहीये." मुलाखत घेणाऱ्याने का असा प्रश्न विचारता, लतादीदी हसत म्हणाल्या होत्या, "लता मंगेशकर असल्याच्या ज्या अडचणी किंवा समस्या आहेत त्या तिलाच माहित आहेत."

गानकोकिळा लता मंगेशकर यांना या जगाचा निरोप घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याचा संघर्ष याच एका उत्तरात सांगितला होता. 50,000 हून अधिक गाणी गायली, संगीत जगतातील सर्वोच्च व्यक्तिमत्व बनल्या. असा कोणताही सन्मान नव्हता, जो त्यांना मिळाला नाही. पण तरीही त्यांना पुन्हा लता मंगेशकर व्हायचे नव्हते.

लहानपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी दुःख आणि संघर्ष पाहिला. लहान वयातच वडिलांचे निधन झाले, त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र दीदींनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर जिद्दीने मात केली.

आज लतादीदींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टी वाचा...

मंगेशकरांचे हर्डीकर होते खरे आडनाव
लतादीदी यांचे नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण, दिनानाथ मंगेशकर यांच्या 'भावबंध' या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी हेमा नाव बदलून लता असे ठेवले.

मंगेशकर कुटुंबीयांचे मूळ आडनाव हर्डीकर होते. पण ते मूळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली.

केवळ दोनच दिवस शाळेत गेल्या होत्या दीदी
लतादीदी केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर दीदींनी आपल्या वर्गातील मुलांना गाणे शिकवणे सुरु केले होते. शिक्षकांनी त्यांना रागावल्यानंतर दीदी नाराज झाल्या आणि त्यानंतर त्या कधीच शाळेत गेल्या नाही.

5 वर्षांच्या लताला सुरात गाताना पाहून वडिलांनी संगीत शिकवण्याचा घेतला निर्णय
लतादीदींचे वडील संगीतकार होते. त्यामुळे घरात संगीताचे वातावरण होते. लोक त्यांच्याकडे संगीत शिकायला येत असत, दिवसभर नाटकांच्या गाण्यांची तालीम व्हायची. लतादीदी सुद्धा संगीत ऐकायच्या, पण वडिलांसमोर त्या गायल्या नाहीत. जेव्हा त्यांची आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असत तेव्हा लता गाणी गात असत.

एके दिवशी दीनानाथ घरी कोणाला तरी संगीत शिकवत होते. त्यानंतर अचानक त्यांना काही कामानिमित्त घराबाहेर जावे लागले. निघताना ते संगीत शिकायला आलेल्या व्यक्तीला म्हणाले- मी थोड्या वेळात येतो, तोपर्यंत तू रियाज कर. 5 वर्षांच्या लतादीदी गॅलरीत उभ्या राहून या सर्व गोष्टी ऐकत होत्या. दीनानाथ गेल्यानंतर त्या माणसाने रियाज सुरू केला, पण चुकीचा सूर लावला. यावर लतादीदींनी त्यांना अडवत चुक दुरुस्त केली. लता दीदींना कल्पना नव्हती की, त्यांचे वडील मागे उभे राहून ऐकत आहेत. वडिलांना पाहताच चिमुकली लता स्वयंपाकघरात आईकडे धावत गेली. या घटनेनंतर दीनानाथ यांनी त्यांना सकाळी 6 वाजता उठवले आणि त्यांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली.

वयाच्या 9व्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला, गाऊन झाल्यावर वडिलांच्या मांडीवर झोपी गेल्या
वडील दीनानाथ नाटक कंपनी चालवायचे. एके दिवशी कंपनीतील काही लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना सादरीकरण करण्यास सांगितले. दीनानाथांनी ते मान्य केले. 9 वर्षांच्या लता दीदींनीही त्यांच्यासोबत परफॉर्म करण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला वडिलांनी नकार दिला, पण खंबावती रागात गाणार असल्याचे सांगितल्यानंतर वडिलांनी होकार दिला.

त्याच दिवशी संध्याकाळी लहानग्या लताने वडिलांसोबत परफॉर्म दिला. लता दीदींच्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. त्यानंतर दीनानाथ यांनी सादरीकरण दिले. ते गात असताना लतादीदी त्यांच्या मांडीवर झोपी गेल्या. दीनानाथ यांनी लताला मांडीवर झोपवून सादरीकरण दिले.

करिअरमधले पहिले गाणे रिलीज झाले नाही
1942 च्या 'किती हसाल' या चित्रपटाचे संगीतकार सदाशिवराव निवरेकर हे लतादीदींच्या वडिलांचे चांगले मित्र होते. या चित्रपटासाठी त्यांना लतादीदींच्या आवाजातील गाणे हवे होते. ही बाब त्यांनी वडील दीनानाथ यांना सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. लता दीदींनी चित्रपटसृष्टीत काम करू नये, अशी त्यांची इच्छा होती. निवरेकर यांनी दीनानाथ यांना मैत्रीची शपथ देऊन राजी केले. लतादीदींनी त्या चित्रपटात एक गाणे गायले, पण नंतर तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि गाणेही प्रदर्शित झाले नाही.

हलाखीच्या परिस्थितीमुळे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, पहिली फी होती 25 रुपये
एप्रिल 1942 मध्ये लता दीदींच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लतादीदींच्या खांद्यावर आली. दरम्यान, मास्टर विनायक यांनी त्यांच्या 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. पैशांची गरज असल्याने दीदींनी होकार दिला आणि चित्रपटात छोटी भूमिकाही केली. चित्रपटातील 'नटली चैत्राची नवलाई' हे गाणे दीदींनी गायले. या गाण्यासाठी त्यांना 25 रुपये आणि चित्रपटातील भूमिकेसाठी एकूण 300 रुपये फी मिळाली. त्यानंतर त्यांनी मास्टर विनायक यांच्या कंपनीत काम केले.

पैशाअभावी घर रिकामे करण्याची वेळ आली होती
लतादीदी आपल्या कुटुंबासह कोल्हापुरात आल्यानंतर मास्टर विनायक यांनी दिलेल्या घरात राहत होत्या. मास्टर विनायक यांचे 1947 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी लतादीदींवर घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

दरम्यान एक कॅमेरामन लतादीदींना भेटायला आला. तो म्हणाला- एक हरिश्चंद्र बाली आहेत, ज्यांना तुम्हाला भेटून तुमचे गाणे ऐकायचे आहे. दुसऱ्या दिवशी दीदी त्यांना जाऊन भेटल्या. त्यांनी लतादीदींना ऐकून गाण्याची संधी दिली. त्या बदल्यात त्यांनी लतादीदींना 14 हजार रुपये दिले. लतादीदींनी तेच पैसे घरभाडे म्हणून दिले. त्यानंतर त्यांना त्या घरात राहण्याची परवानगी देण्यात आली.

जेव्हा आवाज पातळ म्हणून नाकारला गेला
हरिश्चंद्र बालींच्या चित्रपटासाठी दीदी गाणे रेकॉर्ड करत असताना एका पठाणाने त्यांचा आवाज ऐकला. दीदींचा आवाज ऐकताच ती व्यक्तीने गुलाम हैदर अली यांना भेटायला गेली. पठाण त्यांना म्हणाला - एक नवीन मुलगी आली आहे, जी खूप छान गाते. तिला एकदा फोन करून ऐकायलाच हवे. मास्टर गुलाम हैदर अली यांनी भेटण्याचे मान्य केले.

लतादीदींना मास्टर हैदर अलींच्या भेटीचा निरोप आला. दुसऱ्या दिवशी त्या त्यांच्या चुलत बहिणीसोबत मास्टर गुलाम हैदर अलींच्या स्टुडिओत भेटायला गेल्या. तिथे त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची वाट पाहत राहिल्या. शेवटी त्यांची भेट मास्टर हैदर अलींशी झाली. इतका वेळ थांबायला लावल्याबद्दल त्यांनी माफी मागितली, नंतर गाण्यास सांगितले. ते लतादीदींवर खूप प्रभावित झाले होते.

मास्टर हैदर अली यांनी लतादीदींची ओळख निर्माता शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली, ते त्यावेळी 'शहीद' चित्रपटावर काम करत होते, परंतु त्यांनी लता यांना काम देण्यास नकार दिला. मुखर्जी म्हणाले- या मुलीचा आवाज खूप पातळ आहे.

'आज तुम्ही रिजेक्ट केले. मात्र एक दिवस असा येईल जेव्हा सर्व निर्माते आणि दिग्दर्शक लताच्या पाया पडून तिला आपल्या चित्रपटात गाणे गाण्याची विनंती करतील.' 'शहीद' या चित्रपटाचे दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांचा आवाज खूप पातळ असल्याचे कारण देत त्यांना रिजेक्ट केले होते. तेव्हा दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी रागात येऊन ही भविष्यवाणी केली होती.

मास्टर हैदर अली यांनी दिला होता पहिला ब्रेक
यानंतर, 1948 मध्ये मास्टर हैदर अली यांनी लतादीदींना 'मजबूर' चित्रपटातील 'दिल मेरा तोडा, मुझे कहीं का ना छोड दिया' हे गाणे गाण्याची संधी दिली. हा दीदींच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरला.

मधुबालाचा आवाज बनून मिळाली मोठी ओळख
1948 मध्ये लता दीदींनी ‘महल’ या चित्रपटातील 'आयेगा आने वाला' हे गाणे गायले होते. हे गाणे मधुबालावर चित्रित करण्यात आले होते. याच गाण्याने लता दीदींना हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून ओळख मिळवून दिली.

पैशाअभावी स्टुडिओत चालत जायच्या
करिअरच्या सुरुवातीच्या काळात लतादीदी घरापासून रेकॉर्डिंग स्टुडिओपर्यंत चालत जात होत्या. गाणी रेकॉर्ड केल्यानंतर त्या फावल्या वेळेतही रेकॉर्डिंग स्टुडिओतच बसायच्या. त्या पूर्ण दिवस काहीही न खाता घालवायच्या. त्याचे कारण म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओतही कॅन्टीन आहे हे त्यांना माहीत नव्हते. दुसरे कारण म्हणजे त्यांच्याकडे कमी पैसे असायचे. त्यांच्याकडे एक-दोन रुपये असायचे, त्यामुळे त्या घरातून स्टुडिओपर्यंत चालत जायच्या. उरलेल्या पैशांतून त्या कुटुंबासाठी भाजीपाला विकत घ्यायचा. स्वतः उपाशी राहिल्या तरी घरातील सदस्यांना जेवल्याशिवाय झोपू नये, अशी त्यांचे म्हणणे होते.

दिलीप कुमार यांच्या टोमण्यांमुळे लतादीदी उर्दू शिकल्या
एके दिवशी लतादीदी संगीतकार अनिल बिस्वास आणि दिलीप कुमार यांच्यासोबत लोकल ट्रेनने गोरेगावला जात होत्या. लता यांची दिलीप कुमार यांच्याशी ओळख करून देताना अनिल बिस्वास म्हणाले- दिलीप, ही लता मंगेशकर आहे आणि ती खूप छान गाते. त्यावर दिलीप कुमार यांनी विचारले की, त्या मुळच्या कुठल्या आहेत. अनिल बिस्वास यांनी दीदी मराठी असल्याचे सांगितले.

मराठी हा शब्द ऐकताच दिलीप कुमार चेहरा विचित्र करून म्हणाले - मराठी लोकांच्या भाषेत काय आहे. मराठी लोकांना उर्दू येत नाही. लतादीदींना त्यांचे बोलणे खूप वाईट वाटले. यानंतर त्यांनी उर्दू शिकण्याचे ठरवले आणि त्या उर्दू भाषा शिकल्या.

दीदी स्वतःची गाणी ऐकत नसत
लता दीदी स्वतः गायलेली गाणी कधीच ऐकत नसत, असा किस्साही प्रसिद्ध आहे. जर मी स्वतःची गाणी ऐकली तर त्यात 100 उणीवा सापडतील, असे दीदींचे म्हणणे होते.

1958 मध्ये आलेल्या 'मधुमती' चित्रपटासाठी मिळाला होता पहिला पुरस्कार
लता मंगेशकर यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार 1958 मध्ये आलेल्या 'मधुमती' चित्रपटातील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी मिळाला होता. हे गाणे सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केले. त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार 'बीस साल बाद' या चित्रपटातील 'कहीं दीप जले कहीं दिल के लिए' या गाण्यासाठी मिळाला होता.

जेव्हा लतादीदींना विष देऊन मारण्याचा झाला होता प्रयत्न
वयाच्या 33 व्या वर्षीपर्यंत लतादीदी गानकोकिळा झाल्या होत्या. मात्र त्यांच्या प्रगतीचा कुणाला इतका हेवा वाटला की, त्याने त्यांना विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. लतादीदींच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण आणि भयानक टप्पा होता. यामुळे त्या तीन महिने अंथरुणाला खिळून होत्या. शरीर इतके अशक्त झाले होते की, त्यांना अंथरुणावरून उठताही येत नव्हते, चालताही येत नव्हते. या कठीण काळात मजरूह सुलतानपुरी त्यांचा आधार बनले. मजरूह दिवसभर आपले काम करून संध्याकाळी लतादीदींकडे यायचे आणि त्यांना कविता ऐकवायचे.

आपल्या या कठीण प्रसंगाविषयी बोलताना एकदा लतादीदी म्हणाल्या होत्या की, जर या कठीण काळात मजरूह माझ्यासोबत नसते तर कदाचित मी या कठीण काळावर मात करू शकले नसते. या अपघातामुळे लता दीदींनी त्यांचा आवाज गमवला अशीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी याचा इन्कार केला आणि म्हणाल्या की, मी माझा आवाज कधीच गमावला नाही.

लतादीदींना त्यांना कुणी विष दिले हे समजले होते, पण त्यांच्याकडे त्या व्यक्तीविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीवर पोलिस कारवाई होऊ शकली नाही.

आजारपणानंतर पहिल्या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला
प्रदीर्घ उपचारानंतर लतादीदींनी 'कही दीप जले कही दिल' हे गाणे गायले. या गाण्याचे रेकॉर्डिंग व्यवस्थित पार पडले. पुढे या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

शास्त्रीय गायिका होऊ न शकल्याची आयुष्यभराची खंत
वडिलांच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी लतादीदींच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्यांनी अभिनेत्री आणि गायिका म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना शास्त्रीय संगीताचा सराव करायला पुरेसा वेळ मिळाला नाही. करिअरमध्ये यश मिळाल्यानंतर आपण शास्त्रीय गायिका होऊ शकलो नाही, याची खंत त्यांना आयुष्यभर होती.

लतादीदी आपल्या तत्त्वांवर ठाम असायच्या
लतादीदींनी दुहेरी अर्थाची गाणी कधीच गायली नाहीत. त्यामुळे त्यांचे अनेक लेखकांशी मतभेद असायचे. लतादीदींमुळे अनेक लेखकांना गाण्याचे शब्द बदलावे लागले.

रफी साहब यांच्यावर एवढ्या नाराज होत्या की त्यांनी त्यांच्यासोबत 4 वर्षे काम केले नाही
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबतदेखील अनेक गायली. पण एक काळ असा होता, जेव्हा लतादीदी आणि रफी साहेब यांच्यात वाद झाला होता. तब्बल 4 वर्षे त्यांच्यात अबोला होता. 1961 च्या 'माया' चित्रपटातील 'तेरे दिल में' या गाण्याच्या दरम्यान स्टुडिओमध्ये, लता आणि रफी साहब यांच्यात गायकांच्या रॉयल्टीवरून वाद झाला आणि दोघांनी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. लता मंगेशकर यांनी इंडस्ट्रीतील सर्व गायकांच्यावतीने आवाज उठवला आणि त्यांच्यासाठी रॉयल्टीची मागणी केली. सर्व गायकांनी बैठक घेतली पण रफी साहेब हे लतादीदी आणि रॉयल्टी मागणाऱ्या सर्व गायकांच्या विचाराच्या विरोधात होते. रफी साहेबांनी लतादीदींना सांगितले की, मी यापुढे तुमच्या सोबत गाणे गाणार नाही. इंडस्ट्रीत नवोदित लतादीदींनी प्रतिक्रिया देताना म्हटले, तुम्ही काय माझ्यासोबत गाणे गाणार नाही, मी स्वतः तुमच्यासोबत गाणे कधीच गाणार नाही. या दोघांनी जवळपास 4 वर्षे एकत्र गाणे किंवा एकही स्टेज शेअर केला नाही.

असा मिटला होता वाद
लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी 1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ज्वेल थीफ' चित्रपटातील 'दिल पुकारे आ रे आ रे' या गाण्याला त्यांचा मधुर आवाज दिला. मोहम्मद रफी आणि लताजी यांच्यातील चार वर्षांचा वाद मिटवण्याचे श्रेय या गाण्याला देणे चुकीचे ठरणार नाही. 1967 मध्ये संगीतकार जयकिशन यांच्या सांगण्यावरून रफी साहेबांनी लतादीदींना पत्र लिहून माफी मागितली होती. 1967 मध्ये आरडी बर्मन यांनी आयोजित केलेल्या एका समारंभात दोघांनी त्याच वर्षी रिलीज झालेल्या 'ज्वेल थीफ' चित्रपटातील हे गाणे गायले आणि भांडण संपवले. जयकिशन यांच्यामुळेच या दोघांमध्ये पुन्हा मैत्रीचे नाते निर्माण झाले.

ओ.पी. नय्यर यांच्यासाठी एकही गाणे गायले नाही
लतादीदींनी यश मिळवल्यानंतर अनेक बड्या संगीतकारांसोबत काम केले, पण संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी त्यांना कधीही संधी दिली नाही. लतादीदींचा आवाज प्रत्येक संगीतकारासाठी हमखास हिट गाण्याची गॅरंटी होता, पण ओ.पी. नय्यर यांचे त्यांच्या रचनांसाठी दीदींचा आवाज फिट नसल्याचे मत होते.

1955 मध्ये बनल्या संगीतकार
यशस्वी गायिका झाल्यानंतर लता मंगेशकर यांनी 'राम राम पावणे' या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी अर्धा डझन मराठी चित्रपटांना संगीत दिले.
प्रोडक्शन हाऊस सुरू केले, पण त्यात यश मिळाले नाही.

लता मंगेशकर यांनी 1990 मध्ये त्यांचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. या बॅनरखाली त्यांनी गुलजार दिग्दर्शित 'लेकीन' या चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर लतादीदींनी चित्रपट निर्मिती बंद केली. प्रोडक्शन हाऊस सुरू करण्याआधीच लतादीदींनी वादळ (मराठी चित्रपट), झांझर आणि कांचन गंगा या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले होते.

बातम्या आणखी आहेत...