आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर हेल्थ अपडेट:डॉक्टरांनी लता मंगेशकर यांच्या चाहत्यांना केलं त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन, म्हणाले- त्या अजूनही ICUमध्ये आहेत

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लता मंगेशकर काही काळ हॉस्पिटलमध्ये राहतील

गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता शनिवारी लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समधानी यांनी निवेदनात म्हटले आहे की, त्या अजूनही आयसीयूमध्ये ऑब्जर्वेशनमध्ये आहेत. यासोबतच त्यांनी लता मंगेशकर यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले आहे.

लता मंगेशकर काही काळ हॉस्पिटलमध्ये राहतील
ब्रीच कँडी हॉस्पिटलचे असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रतीत समधानी यांनी सांगितले की, लता मंगेशकर काही काळ हॉस्पिटलमध्येच राहतील. समधानी म्हणाले, "लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली आहेत. आपल्याला वाट पहावी लागेल. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, त्या काही दिवस रुग्णालयातच राहतील." 92 वर्षीय लता मंगेशकर यांना गेल्या आठवड्यात कोरोना आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे होती.

कोरोनासोबतच न्यूमोनियाने पीडित आहेत लता मंगेशकर
याआधी गुरुवारी प्रतीत समधानी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, "गायिका लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीत आता किंचित सुधारणा झाली आहे. लता दीदींसाठी सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना सध्या भेटू दिले जात नाही. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांना10 ते 12 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे.'

गेल्या काही वर्षांपासून प्रतीत समधानी करत आहेत त्यांच्यावर उपचार
लता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून डॉ. प्रतीत समधानी हे उपचार करत आहेत. 92 वर्षीय लता दीदी यांना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या 28 दिवस रुग्णालयात होत्या.

कोरोनावर मात करुन त्या लवकरच घरी परततील
यापूर्वी लता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी दीदींच्या प्रकृती विषयी माहिती दिली होती. ‘लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरच कोरोनावर मात करुन घरी परततील,’ असे रचना शहा म्हणाल्या होत्या. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी फोन केला होता.

घरातील कर्मचाऱ्यामुळे लता मंगेशकर यांना झाली कोरोनाची लागण
लता मंगेशकर यांच्या 'एलएम म्युझिक' या म्युझिक लेबलचे सीईओ मयुरेश पै यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये सांगितले की, घरात काम करणारे कर्मचारी सामान आणण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यापैकी एका कर्मचार्‍याला संसर्ग झाला होता. लता दीदी त्याच्या संपर्कात आल्या होत्या, त्यामुळे त्यांची कोविड चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मयुरेश पै यांनी पुढे सांगितले की, लता दीदींच्या कुटुंबातील त्यांची बहीण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह कोणत्याही सदस्याला कोरोना झाला नाही. मुंबईतील पॅडर रोडस्थित निवासस्थानी लता दीदी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. 2019 पासून त्या घराबाहेर पडल्या नाहीत. त्या कुणाला भेटतदेखील नाहीत.

बातम्या आणखी आहेत...