आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर हेल्थ अपडेट:लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबीय म्हणाले - चाहत्यांच्या प्रार्थनामुळे लता मंगेशकरांची प्रकृती सुधारत आहे

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातील कर्मचाऱ्यामुळे लता मंगेशकर यांना झाली कोरोनाची लागण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे. त्यांच्या तब्येतीत हळुहळु सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. पण पुढील काही दिवस त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी सांगितल्यानुसार, “लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. सध्या त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यामुळे आम्ही आनंदी आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनामुळे त्यांची प्रकृती सुधारत आहे. पण यासोबतच आमची काही गोपनीयताही लक्षात ठेवा,” असेही त्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले.

बुधवारी डॉक्टरांनीही दिली होती माहिती
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समधानी यांनी बुधवारी एएनआयला सांगितले होते की, "गायिका लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे. त्यांनी पुढे सांगितल्यानुसार, लतावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. त्या ब-या होत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिले जात नाहीये. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांना पुढील 10-12 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रतीत समधानी करत आहेत त्यांच्यावर उपचार
लता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून डॉ. प्रतीत समधानी हे उपचार करत आहेत. 92 वर्षीय लता दीदी यांना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या 28 दिवस रुग्णालयात होत्या.

घरातील कर्मचाऱ्यामुळे लता मंगेशकर यांना झाली कोरोनाची लागण
लता मंगेशकर यांच्या 'एलएम म्युझिक' या म्युझिक लेबलचे सीईओ मयुरेश पै यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये सांगितले की, घरात काम करणारे कर्मचारी सामान आणण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यापैकी एका कर्मचार्‍याला संसर्ग झाला होता. लता दीदी त्याच्या संपर्कात आल्या होत्या, त्यामुळे त्यांची कोविड चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मयुरेश पै यांनी पुढे सांगितले की, लता दीदींच्या कुटुंबातील त्यांची बहीण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह कोणत्याही सदस्याला कोरोना झाला नाही. मुंबईतील पॅडर रोडस्थित निवासस्थानी लता दीदी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. 2019 पासून त्या घराबाहेर पडल्या नाहीत. त्या कुणाला भेटतदेखील नाहीत.

बातम्या आणखी आहेत...