आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदींची प्रकृती चिंताजनक:लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली; दीदी लवकरच बरे व्हाव्यात यासाठी जगभरात प्रार्थना

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटीनमध्ये देण्यात आली आहे. काल लता मंगेशकर यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून 92 वर्षीय लता दीदी आयसीयूमध्ये आहेत. रुग्णालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नितीन गडकरी रुग्णालयात पोहोचले

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांशी विचारपुस केली. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत ब्रीच कँडी रुग्णालयात विचारपुस करण्यासाठी पोहोचले आहेत.

  • रश्मी ठाकरे ब्रीच कँडीत पोहोचल्या
  • नितीन गडकरी देखील आज रुग्णालयात येऊन दीदींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येणार
  • गायिका अनुराधा पौडवाल रुग्णालयात पोहोचल्या
बातम्या आणखी आहेत...