आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे नील नितिन मुकेश:लता मंगेशकर यांनी ठेवले होते नीलचे नाव, शाहरुख खानने अवॉर्ड फंक्शनमध्ये आडनावावरुन उडवली होती खिल्ली

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीलचे संपूर्ण नाव नील नितिन मुकेश चंद माथुर असे आहे.

15 जानेवारी 1892 रोजी मुंबईत जन्मलेल्या नीत नितिन मुकेशने वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत. नीलने बालकलाकार म्हणून विजय आणि जैसी करनी वैसी भरनी या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. एका दीर्घ ब्रेकनंतर त्याने 2007 मध्ये लीड अॅक्टर म्हणून जॉनी गद्दार द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याला या चित्रपटातील भूमिकेसाठी 53 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट मेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते. नील नितिन मुकेश चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या नावामुळेही बराच चर्चेत राहिला. जाणून घेऊयात त्याच्या नावामागची कहाणी

लता मंगेशकर यांनी ठेवले होते नीलचे नाव...
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे मुकेश यांच्या कुटुंबीयांसोबतचे अतिशय जवळचे नाते आहे. लता दीदींनी पहिले मुकेश आणि नंतर त्यांचा मुलगा नितिन मुकेश यांच्यासोबत अनेक हिट साँग गायले. लता दीदींनीच नितिन यांचा मुलगा नीलचे नाव ठेवले होते. याच नावाने बॉलिवूडमध्ये करिअर करणा-या नीलने त्याच्या नावासोबत नितिन आणि मुकेश ही वडील-आजोबांची नावे लावली आहेत. तसे नीलचे संपूर्ण नाव नील नितिन मुकेश चंद माथुर असे आहे.

शाहरुखने अवॉर्ड फंक्शनमध्ये उडवली होती नीलची खिल्ली
फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलेल्या शाहरुख आणि सैफ अली खान यांनी नीलच्या नावावरुन त्याची खिल्ली उडवली होती. अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखने म्हटले होते, 'नील नितिन मुकेश माझा तुला एक प्रश्न आहे. तुझे नाव नील, नितिन, मुकेश आहे, मग तुझे आडनाव कुठे आहे. आमच्या सगळ्यांची आडनावं आहेत. तुझे कुठे आहे?'

नीलने दिले होते प्रत्युत्तर
शाहरुखच्या या प्रश्नावर नीलने प्रत्युत्तर दिले होते. तो म्हणाला होता, 'मला तुमचा प्रश्न आवडला. पण हे माझ्यासाठी अपमानास्पद आहे. तुम्ही कदाचित बघितले नसावे, पण माझे वडीलदेखील येथे उपस्थित आहेत. तुम्ही असा प्रश्न विचारणे योग्य नाही. मला वाटतंय तुम्ही आता गप्प राहायलं हवं,' असे उत्तर त्याने दिले होते.

सिनेमात न्यूड सीन देऊन एकवटली होती नीलने चर्चा...

नीलला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती 2009 साली रिलीज झालेल्या 'जेल' या सिनेमातून. या सिनेमात त्याने न्यूड सीन दिले होते. सिनेमातील एका सीनमध्ये तो संपूर्ण विवस्त्र दिसतो. मधुर भंडारकर दिग्दर्शित हा सिनेमा खरं तर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण नीलच्या नावाची खूप चर्चा झाली. नीलने आतापर्यंत 'न्यूयार्क' 'लफंगे परिंदे', 'तेरा क्या होगा जॉनी', '7 खून माफ', 'प्लेयर्स', 'डेविड', '3 जी', 'शॉर्ट कट रोमियो' या सिनेमांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...