Lata Mangeshkar Rare Photos; Legendary Singer Lata Mangeshkar Pictures From The Past From The Journey Of Acting At The Age Of 13 | Marathi News
एका संगीत युगाचा अस्त:वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयातील प्रवासापासून ते पं. नेहरु यांच्या डोळ्यांत अश्रू येईपर्यंत... PHOTOS मध्ये बघा दीदींचा प्रवास
4 महिन्यांपूर्वी
कॉपी लिंक
'भारतरत्न' लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लताजींच्या म्हणण्यानुसार, 'बाबा हयात असते, तर कदाचित मी गायिका झाले नसते'... हे मानणाऱ्या महान गायिका लता मंगेशकर आपल्या वडिलांसमोर फार काळ गाण्याचे धाडस करू शकल्या नाहीत. मग कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांनी एवढं गाणं गायलं की 1974 ते 1991 या काळात सर्वाधिक गाण्यांची नोंद करून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. लताजींच्या काही खास आठवणी छायाचित्रांमध्ये पाह ...
९ सप्टेंबर १९३८ रोजी लतादीदींनी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत सोलापुरात पहिला शास्त्रीय परफॉर्मन्स दिला. ही गोष्ट 83 वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा लताजी फक्त ९ वर्षांच्या होत्या.
वडिलांमुळेच आज आपण गायिका बनू शकलो, कारण त्यांनी संगीत शिकवलं, असा लताजींचा विश्वास होता. लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांना त्यांची मुलगी गाऊ शकते हे फार काळ माहीत नव्हते. लतादीदींना त्यांच्यासमोर गाण्याची भीती वाटत होती. स्वयंपाकघरात आईच्या कामात मदत करायला आलेल्या बायकांना त्या गाणं म्हणून दाखवायच्या. आई रागवायची कारण लतादीदींमुळे त्या बायकांचा वेळ वाया जायचा, असे त्यांना वाटत होते.
लतादीदींनी मास्टर विनायक यांच्या बडी माँ (1945) या पहिल्या हिंदी चित्रपटात बहीण आशासोबत छोटी भूमिका केली होती. आशा भोसले लताजींपेक्षा ४ वर्षांनी लहान आहेत.
वयाच्या 13 व्या वर्षी लतादीदींनी 1942 मध्ये 'पहली मंगळागौर' चित्रपटात काम केले होते. काही चित्रपटांमध्ये त्यांनी नायक-नायिकेच्या बहिणीची भूमिका साकारली आहे, पण अभिनयाचा आनंद त्यांना कधीच आला नाही.
२६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकर यांनी लाल किल्ल्यावरून 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे गायले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात अश्रू आले होते.
हा किस्सा सांगताना स्वतः लतादीदी म्हणाल्या, '1962 च्या भारत-चीन युद्धानंतर, प्रदीपजींनी 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे लिहिले होते जे मी 1963 च्या प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदा गायले होते. गाणे संपवून मी स्टेजवरून उतरले आणि कॉफी मागवली. तेवढ्यात मेहबूब साहेब धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'लताजी, तू कुठे आहेस... पंडितजींना तुला भेटायचे आहे. मग मी त्यांच्या मागे गेले. मला पाहताच पंडितजी उठून उभे राहिले. इंदिराजी आणि अनेक मोठे नेतेही तिथे उपस्थित होते. मेहबूब साहेबांनी माझी ओळख पंडितजींशी करून दिली ' या लता मंगेशकर आहेत'. तेव्हा नेहरू मला म्हणाले, 'मुली, आज तू मला रडवलेस'.
एकदा अमेरिकेत लतादीदींची मैफल होती, तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना भेटायला गेले. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता, मग दीदी म्हणाल्या, तू मेरे अंगने में... अशा गाण्याने सुरुवात कर. मग मला स्टेजवर बोलवा, मी स्टेजवर आल्यानंतर माझी ओळख करून द्या. ते म्हणाले की, मी स्टेजवर असे कधी केले नाही. ते कधी ना कधी करावेच लागेल, आज करूया, असे दीदींनी सांगितले. त्यानंतर त्यांनी स्टेजवर मेरे अंगने में... हे गाणे गायले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्टेज शो करायला सुरुवात केल्याचे सांगितले.
हा फोटो 1973 मधला आहे, जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाशी लग्न केले होते, तेव्हा लता मंगेशकरही तिथे पोहोचल्या होत्या.
नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचेही घट्ट नाते आहे. लतादीदींना त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जेव्हा एक-दोन मजल्यांनी वाढवले, तेव्हा नरेंद्र मोदी हॉस्पिटल बघायला आले होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा दीदी म्हणाल्या की, मला वाटते की तुम्ही लवकरच देशाचे पंतप्रधान व्हावे. ही भेट 2007-08 सालची आहे. त्यांचे म्हणणे खरे ठरले आणि नंतर ते पंतप्रधान झाले.
लता मंगेशकर आणि राज कपूर यांचे नाते अगदी कौटुंबिक होते. राज कपूरच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात लताजींचा आवाज नायिकेचा होता. इतके घनिष्ठ नातेसंबंध असतानाही लताजी त्यांच्या तत्त्वांवर ठाम राहिल्या आणि काही वेळा त्यांचे राज कपूर यांच्याशी मतभेदही झाले.
लता मंगेशकर आणि मोहम्मद. रफीचं नातं खूप इंटरेस्टिंग होतं. गायकांना गाण्यांना रॉयल्टी मिळत नसल्याबद्दल लतादीदी खूप बोलक्या होत्या आणि रफी याच्या विरोधात होते. हे मतभेद मनभेदांचे कारण बनले आणि 1963 ते 1967 पर्यंत लता रफी यांनी एकही गाणे एकत्र गायले नाही. नंतर रफी साहेबांनी लताजींना पत्र लिहून माफी मागितली आणि नंतर दोघांनी ज्वेल थीफ चित्रपटासाठी एकत्र गाण्याचे मान्य केले.
लता मंगेशकर यांच्या कुशीतले हे दुसरे कोणी नसून ऋषी कपूर आहेत, तेव्हा ते दोन-तीन महिन्यांचे होते. हा फोटो स्वतः दिवंगत ऋषी कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.
लतादीदी आणि मीना कुमारी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मीना कुमारी लतादीदींना भेटायला अनेकदा रेकॉर्डिंग स्टुडिओत जात. लताजींचा असा विश्वास होता की त्यांचा आवाज मीना कुमारी आणि नर्गिसला खूप सूट होतो.