आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए मेरे वतन के लोगों:लता मंगेशकर यांचा खुलासा - सुरुवातीला हे गाणे गायला नकार दिला होता, नंतर जेव्हा गायले तेव्हा नेहरुजींच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या गाण्यामागील संपूर्ण कहाणी लताजींनी एका मुलाखतीत कथन केली.

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी सांगितल्यानुसार, 1963 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जेव्हा त्यांना 'ए मेरे वतन के लोगों' हे गाण्याची ऑफर मिळाली होती तेव्हा त्यांनी प्रथम ती नाकारली होती. कारण त्यावेळी त्यांच्याकडे गाण्याची रिहर्सल करायला वेळ नव्हता. मात्र, जेव्हा त्यांनी हे गाणे गायले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. हे गाणे इतके लोकप्रिय झाले होते की त्यांचा कोणताही शो किंवा कॉन्सर्ट त्या गाण्याशिवाय पूर्ण होत नव्हता. या गाण्यामागील संपूर्ण कहाणी लताजींनी एका मुलाखतीत कथन केली, जे अत्यंत रंजक आहे.

एका गाण्यावर विशेष लक्ष देणे शक्य नव्हते
स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, लता मंगेशकर यांनी सांगितले, कवी प्रदीप यांनी गाण्याचे अमर बोल लिहिले होते. त्यांनीच 26 जानेवारी 1963 रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात त्यांना हे गाण्याची विनंती केली होती. सुरुवातीला त्या हे गाणे गाण्यासाठी तयार नव्हत्या, कारण त्या काळात लता दीदी 24 तास काम करत होत्या आणि एका गाण्यावर विशेष लक्ष देणे त्यांना शक्य नव्हते.

पण, जेव्हा प्रदीपजींनी त्यांची समजूत घातली, तेव्हा त्या धाकटी बहीण आशाबरोबर हे गाणे गायला तयार झाल्या. पण कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्याच्या काही दिवस आधी आशा यांनी दिल्लीला जाण्यास नकार दिला. लताजींनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर संगीतकार हेमंत कुमार यांनीसुद्धा आशा यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्या दिल्लीला यायला तयार झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत लताजींना एकटीच गाण्याची तयारी करावी लागली.

सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते गाणे
हे गाणे संगीतबद्ध करणारे सी. रामचंद्र हे देखील 4-5 दिवसांपूर्वीच दिल्लीला रवाना झाले होते. अशा परिस्थितीत लताजींना रिहर्सलवेळी त्यांची साथ मिळू शकली नव्हती. मात्र रामचंद्र यांनी त्यांना गाण्याची एक टेप दिली होती, जी ऐकून लता दीदी गाण्याचा सराव करत होत्या. 25 जानेवारीला दिलीप कुमार, राज कपूर, मेहबूब खान आणि शंकर जयकिशन अशा बड्या स्टार्ससह त्या दिल्लीला रवाना झाल्या. विमानातही लता दीदी रामचंद्र यांनी दिलेली टेप ऐकत राहिल्या.

दिल्लीत पोहोचताच पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता
लता दीदी सांगतात, "मी माझी जिवलग मैत्रीण नलिनी म्हात्रेसोबत होती. आम्ही रात्री दिल्लीला पोहोचलो तेव्हा मला पोटात खूप वेदना होत होत्या. मी नलिनीला सांगितले की मी या परिस्थितीत कसे गाऊ शकेन? त्यावर ती म्हणाली- काळजी करू नको, सारं काही ठीक होईल.' आम्ही 26 जानेवारीला कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मी 'अल्लाह तेरो नाम' हे भजन आणि 'ए मेरे वतन के लोगो' हे गीत गायले.

पंडितजी म्हणाले- माझ्या डोळ्यात पाणी आले

लता दीदी पुढे म्हणतात, "गाणे संपवून मी आराम करण्यासाठी स्टेजच्या मागे गेले. अचानक मेहबूब खान साहेबांनी माझा हात धरला आणि म्हणाले - 'चल पंडितजींनी बोलावले आहे.' मला आश्चर्य वाटले की त्यांना मला का भेटायचे आहे? जेव्हा मी मंचावर पोहोचलो तेव्हा पंडितजी, त्यांची मुलगी इंदिराजी, राधाकृष्णनजी (तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन) यांच्यासह सर्वजण उभे होते आणि माझे स्वागत करत होते.

मेहबूब खान साहेब म्हणाले, 'ही आमची लता आहे. तुम्हाला तिचे गाणे कसे वाटले?' पंडितजी म्हणाले, 'खूप चांगले, माझे डोळे पाणावले आहेत.' मग आमच्या सर्वांना चहासाठी पंडितजींच्या घरी बोलावण्यात आले." लताजींच्या म्हणण्यानुसार, पंडितजींनी तिथे त्यांच्यासोबत फोटो काढले होते.

प्रदीप यांना होता आत्मविश्वास
लताजींच्या म्हणण्यानुसार हे गाणे इतके लोकप्रिय होईल असे अजिबात त्यांना वाटले नव्हते. त्या म्हणतात, "फक्त प्रदीपजींचा आत्मविश्वास होता. त्यांनी मला सांगितले,"लता बघशील हे गाणे खूप लोकप्रिय होईल आणि कायम लोकांच्या लक्षात राहील.' त्यावेळी मी ते गांभीर्याने घेतले नव्हते. चित्रपटातील गाणे नसल्यामुळे हे मर्यादित राहिल, असे मला वाटले होते. पण, 'ए मेरे वतन के लोगों' ही माझी सिग्नेचर ट्युन बनली."

प्रदीपजींना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले नव्हते याबद्दल मला कायम खंत वाटते, असे लताजी म्हणतात. जर ते तिथे असते तर ते प्रत्यक्ष डोळ्यांनी गाण्याचा इम्पॅक्ट बघू शकले असते.

बातम्या आणखी आहेत...