आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागानकोकिळा लता मंगेशकर यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. मात्र लता दीदींनी लग्न केले नाही. त्यांनी आयुष्यभर लग्न का केले नाही. याचे उत्तर त्यांनी स्वत: एका मुलाखतीत दिले होते. लता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, घरात सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर होती. अशावेळी अनेकदा लग्नाचा विचार मनात आला मात्र तो प्रत्यक्षात कधीच अंमलात आणला नाही. खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती.
लता मंगेशकर 13 वर्षांच्या असताना 1942 मध्ये यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली. त्यांचे वडील पंडीत दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता या आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. मात्र पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्यानंतर संपूर्ण कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली होती.
दीदी म्हणाल्या होत्या - 'ते राहून गेलं...'
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत दीदी म्हणाल्या होत्या, "घरातील प्रत्येकाची जबाबदारी माझ्यावर होती. अशात अनेक वेळा लग्नाचा विचार मनात आला तरी ते करू शकले नाही. खूप कमी वयात मी काम सुरू केले. कामही भरपूर होते. वाटले लहान भावंडांना मार्गी लावावे, मग विचार करू. त्यानंतर बहिणीचे लग्न झाले. त्यांना मुले झाली. त्यांना सांभाळायची जबाबदारी होती आणि मग असे करतंच वेळ निघून गेली."
"भावंडांसाठी मी आई आणि वडील दोन्ही भूमिका पार पाडल्या. मी त्यांना कधीच रागावले नाही. आमच्यामध्ये कधीच भांडण झाले नाही. सांगलीत आम्ही मोठ्या घरात राहायचो. आमच्या वडिलांनी ते घर बांधले होते," असे त्यांनी सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.