आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावूक क्षण:दिवंगत अभिनेता चिरंजीवीची पत्नी मेघनाचे बेबी शॉवर, चिरंजीवीच्या स्टॅच्युसोबत दिसले कुटुंबीय-मित्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपूर्वीच चिरंजीवी आणि मेघनाचे लग्न झाले होते.

कन्नड चित्रपटातील अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे 7 जून रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. चिरंजीवी यांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नी आणि अभिनेत्री मेघना राज तीन महिन्यांची गर्भवती होती. नव-याच्या अकाली निधनाने मेघना कोलमडली होती, मात्र आपल्या बाळासाठी ती या दुःखातून स्वतःला सावरतेय. नुकतेच मेघनाचे बेबी शॉवर पार पडले. या सोहळ्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कुटुंबासह दिसते.

विशेष म्हणजे हे फोटो पाहून कुणीही भावूक होईल. यात मेघना चिरंजीवीच्या स्टॅच्युसह दिसतेय. हे फोटो शेअर करत मेघनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या दोन सर्वात खास व्यक्ती. आय लव यू बेबी.'

दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
चिरंजीवी यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. ते दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहात होते. पण चिरंजीवी यांनी अर्ध्यावरच मेघनाची साथ सोडली.

22 चित्रपटांमध्ये केला होता चिरंजीवी यांनी अभिनय
चिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते.

12 मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यांचे आजोबा शक्ती प्रसाद आणि काका अर्जुन सरजा हे देखील चित्रपट कलाकार आहेत. त्यांचे भाऊ ध्रुव सरजा हेदेखील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. आता संपूर्ण कुटुंबीय बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

बातम्या आणखी आहेत...